AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद पॅटर्नचं असं काय झालं की कलेक्टरवर पीएमही नाराज अन् सीएमही! आरोग्य मंत्री टोपे म्हणतात..

देशातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादची चर्चा सध्या राजधानी दिल्लीत सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरणाचा आकडा खूपच कमी असल्यामुळे ही नाराजी व्यक्त केली जातेय. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीनं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

औरंगाबाद पॅटर्नचं असं काय झालं की कलेक्टरवर पीएमही नाराज अन् सीएमही! आरोग्य मंत्री टोपे म्हणतात..
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीही औरंगाबादच्या लसीकरणावर नाराज
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 4:18 PM
Share

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्राचे अन् राज्याचे आरोग्यमंत्रीही औरंगाबादवर नाराज आहेत. असं काय घडलं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर देशातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादची चर्चा सध्या राजधानी दिल्लीत सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरणाचा आकडा खूपच कमी असल्यामुळे ही नाराजी व्यक्त केली जातेय. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीनं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कठोर नियमावली करूनही लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी नोंदले गेले आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांचीही नाराजी

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचा लसीकरणाचा आकडा होता फक्त 56 टक्के आणि त्यातही दुसऱ्या डोसचा टक्का होता तोही 19 टक्क्यांच्या खाली, त्यामुळे 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना औरंगाबादचे लसीकरण वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानंतर कामाला लागलेल्या जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 80 टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. मात्र अजूनही दुसऱ्या डोसचे प्रमाण हे 41 टक्क्यांच्या पुढे सरकत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा नाराजी व्यक्त होत आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

औरंगाबादमधील संथ लसीकरणावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. औरंगाबाद जिल्ह्यात नागरिकांचे लसीकरण वाढवण्यासाठी आणखी प्रभावी पावलं उचलण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत.

लसीकरण टक्केवारी पहिला डोस 80 टक्के दुसरा डोस 41 टक्के

आजपर्यंतचा कोरोना मृत्यू दर :- 2.41 सध्याचा कोरोना पॉझिटिव्ह दर :- 12.3 टक्के

औरंगाबाबद पॅटर्नची नुसतीच चर्चा

औरंगाबाद शहर जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी अनेक कडक निर्णय घेण्यात आले होते. या कठोर नियमावलीची इतर जिल्ह्यांमध्येही चर्चा झाली. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना पेट्रोल डिझेल देण्यास नकार देण्यात आला, लस न घेणाऱ्यांची रेशन किराणा सामान बंद करण्यात आले, शासकीय कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आले, कुठल्याही शासकीय कामासाठी लसीचे प्रमाणात्र बंधनकारक करण्यात आले, इतकंच नाही तर लस घेतली नसेल तर दारू सुद्धा देण्यास बंदी घालण्यात आली इतकं करूनही लसीकरणाचं शंभर टक्के उदिष्ट पूर्ण होऊ शकलेलं नाही.

एक नजर आकडेवारीवर

कोरोना सुरू झाल्यापासून आजपर्यंत औरंगाबाद शहरात तब्बल 3658 रुग्णांचा मृत्यू झालाय आणि माघील वर्षी मार्च एप्रिल मे महिन्यात दिवसाकाठी 20 ते 24 रुग्णांचा सातत्याने मृत्यू होत होता. गेल्या सहा दिवसापासून मात्र औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना मुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 2021 या वर्षी मे महिन्यात पाच दिवसातील मृत्यूंची आकडेवारी अत्यंत गंभीर

23 मे 21 – 23 मृत्यू 22 मे 21 – 24 मृत्यू 21 मे 21 – 23 मृत्यू 20 मे 21 – 24 मृत्यू 19 मे 21 – 15 मृत्यू

कोरोना मृत्यूंमागील कारणं काय?

प्रशासनाने दिलेल्या कारणांनुसार, • औरंगाबादेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण हे मोठ्या प्रमाणात आजार अंगावर काढत आहेत. त्यामुळे रुग्ण सिरीयस झाल्यानंतरच रुग्णालयात येतात त्यामुळे त्यांना वाचवणं कठीण जातं

• अनेक रुग्ण हे वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत अशा रुग्णांना डबल म्युटेंट कोरोना हा लवकर गाठतो त्यामुळे अशा रुग्णांचा मृत्यू होतोय

• औरंगाबादेत बरेच रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातून रेफर केले जात आहेत हे रेफर केलेले रुग्ण जास्त सिरीयस असतात आणि शिफ्ट करताना अनेकदा धोका होतो त्यामुळे अशा रुग्णांचे मृत्यू होत आहेत.

औरंगाबादेत कोरोना मृत्यूचे हे भयानक आकडे समोर असूनही औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक कोरोना लस घेण्यासाठी उदासीन आल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जर कोरोनाचा घातक व्हेरिएंट समोर आला तर औरंगाबादकरांना मोठा झटका बसू शकतो. त्यामुळे वेळीच सावध राहणं गरजेचं आहे.

इतर बातम्या-

वकिलाला जात पाहून रो हाऊस नाकारणाऱ्या बिल्डरचे लायसन्स रद्द करा, RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी

कोरोना रुग्णांना अतिरिक्त बिल लावणाऱ्या हॉस्पिटल्सना नोटिसा, औरंगाबाद महापालिकेची कारवाई!

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.