Aurangabad | शहरात येणार 25 स्मार्ट सिग्नल, ट्रॅफिकच्या प्रमाणानुसार टायमिंग बदलणार, आणखी काय काय स्पेशल?
शहरात एकूण 85 सिग्नल आहेत, त्यापैकी 25 सिग्नलचे रुपांतर स्मार्ट सिग्नलमध्ये होणार आहे. पुढील टप्प्यात शहरातील सर्वच सिग्नल स्मार्ट करण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकार्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
औरंगाबादः स्मार्ट सिटी औरंगाबादमधील (Aurangabad smart city) रस्त्यांवर लावलेले सिग्नलदेखील आता स्मार्ट होणार आहेत. शहरातील जालना रोडवरील हायकोर्ट (High Court) चौकात सिग्नल हे प्रथमच स्मार्ट सिग्नल म्हणून कार्यन्वित करण्यात आले आहे. आता जालना रोड जळगाव रोड, व्हीआयपी रोडवरील सिग्नलवरही स्मार्ट सिग्नल (Smart Signal) बसवण्याचे काम सुरु असून येत्या आठवडाभरात हे सिग्नल कार्यान्वित होतील, अशसी माहिती स्मार्ट सिटीमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्मार्ट सिटी तर्फे शहरात विविध चौकांत 700 पेक्षा जास्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सिग्नलचे कंट्रोल कमांड सेंटर महापालिका तसेच पोलीस आयुक्तालयात आहे. या कॅमेर्यांच्या माध्यमातून सिग्लवर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेतली जाईल. त्यानंतर रेड किंवा ग्रीन सिग्नल केले जाईल.
शहरात 25 स्मार्ट सिग्नल
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे प्रायोगिक तत्त्वावर शहरातील 25 सिग्नल स्मार्ट करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यातील पहिले स्मार्ट सिग्नल हायकोर्ट चौकात कार्यान्वित करण्यात आले आहे. आता जालना रोड, जळगाव रोड, व्हीआयपी रोडवरील 25 सिग्नल आठवडाभरात कार्यान्वित कऱण्यात येणार आहेत. शहराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच रस्ते, सुरक्षेचा विचार करून या सिग्नलचे नियोजन करण्यात आले आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच रस्ते सुरक्षेचा विचारही यामागे करण्यात आला आहे.
स्मार्ट सिग्नलमध्ये काय काय स्पेशल?
– स्मार्ट सिटी तर्फे शहरात विविध चौकांत 700 पेक्षा जास्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सिग्नलचे कंट्रोल कमांड सेंटर महापालिका तसेच पोलीस आयुक्तालयात आहे. या कॅमेर्यांच्या माध्यमातून सिग्लवर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेतली जाईल. त्यानंतर रेड किंवा ग्रीन सिग्नल केले जाईल. – कंट्रोल सेंटरमधील वाहतूक विभागाचे कर्मचारीही शहरातील गर्दीनुसार सिग्नलवर नियंत्रण ठेवू शकतील. – या स्मार्ट सिग्नलची दृश्यमानता चांगली असून रस्त्यावर वाहन चालक 150 मीटरपासून वाहतुकीचे दिवे पाहू शकतील आणि त्यानुसार वाहनांचा वेग कमी-जास्त करू शकतील. – शहरात एकूण 85 सिग्नल आहेत, त्यापैकी 25 सिग्नलचे रुपांतर स्मार्ट सिग्नलमध्ये होणार आहे. – पुढील टप्प्यात शहरातील सर्वच सिग्नल स्मार्ट करण्यात येणार आहेत. – एकाच पोलवर असेलले हे सिग्नल कमानीसारखे दिसतात. त्यावर एलईडी दिवे बसवले आहेत.
इतर बातम्या-
थरकाप उडवणारा व्हिडीओ! इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील बाल्कनीला लटकून व्यायाम, नेटकरी म्हणतात…