Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: सोयगावात महिलाराज, नगराध्यक्ष आशाबी तडवी तर उपाध्यक्ष सुरेखा काळे, अब्दुल सत्तारांचे यशस्वी डावपेच

भविष्यात औरंगाबाद महानगरपालिका, जिल्हा परिषद, व प्रत्येक तालुका पंचायत समित्यांमध्ये भगवा फडकेल असा विश्वास महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.

Aurangabad: सोयगावात महिलाराज, नगराध्यक्ष आशाबी तडवी तर उपाध्यक्ष सुरेखा काळे, अब्दुल सत्तारांचे यशस्वी डावपेच
सोयगाव नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतरची क्षणचित्र
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 3:00 AM

औरंगाबादः शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली गेलेली सोयगावची नगरपंचायत अखेर शिवसेनेने ताब्यात घेतली. आज नगरपंचायतीचे अध्यक्ष व उपाध्यक्षही निवडण्यात आले.  नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा (Shiv Sena won in Soygaon) फडकवल्यानंतर आज येथील अध्यक्ष आणि उपाध्यपदाची निवडणूक पार पडली. पीठासीन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी सभा घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा काळे या दोघींचेच अर्ज प्राप्त झाले होते. विरोधी पक्षातर्फे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे सोयगावचे नगराध्यक्षपद आशाबी तडवी आणि उपवगराध्यक्ष पद सुरेखा काळे यांच्याकडे बिनविरोध गेले. पीठासीन अधिकारी यांनी या दोन्ही पदांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नगराध्यक्ष आशाबी तडवी आणि उपनगराध्यक्ष सुरेखा काळे यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी संजीव मोरे यांनी केली. औरंगाबाद जिल्ह्यात धनुष्यबाण निशाणीवर सोयगाव येथे शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून सिल्लोड आणि सोयगाव येथे शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. भविष्यात औरंगाबाद महानगरपालिका, जिल्हा परिषद, व प्रत्येक तालुका पंचायत समित्यांमध्ये भगवा फडकेल असा विश्वास महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेच्या जल्लोषानं शहर दुमदुमलं

स्थानिक पत्रकार भारत पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे व जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकास लाडू – पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेच्या वतीने मुख्यरस्त्याने विजयी मिरवणूक काढण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सभागृहात शाहिस्ताबी पठाण,अक्षय काळे, दीपक पगारे, हर्षल काळे, वर्षा घनघाव, संध्या मापारी, सविता जावळे, कुसुम दुतोंडे, सुरेखा काळे, संतोष बोडखे, संदीप सुरडकर,भगवान जोहरे,ममताबाई इंगळे, कदिर शहा, सुलताना देशमुख, कुडके व आशाबाई तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

अब्दुल सत्तारांचा दानवेंना जबरदस्त धक्का

सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत निवडणुकीत 17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने विजय मिळवीत स्पष्ट बहुमत मिळविले होते. भाजपच्या ताब्यातील ही नगर पंचायत आपल्या ताब्यात घेऊन राज्यमंत्री सत्तार यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर गटनेता पदाच्या निवडणूकीच्या वेळी सुद्धा भाजपचे 6 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेत खेचून आणत त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा धक्का दिला. या निवडीच्या वेळी नगराध्यक्ष पदासाठी भाजपला सूचक व अनुमोदन न मिळाल्याने ते अध्यक्ष पदासाठी अर्ज देखील करू शकले नसल्याने भाजपला सोयगाव मध्ये मोठी नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. यावेळी सोयगाव नगर पंचायतीमधील भाजपचे ६ पैकी ४ नगरसेवक शिवसेनेत आले असून आता उर्वरित दोघेही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे अशी माहिती देत सोयगाव मधून भाजप भुईसपाट होईल असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

इतर बातम्या-

Nanded Crime : जादूटोणा आणि उपचाराच्या नावाखाली नागरिकांना लुटणाऱ्या भोंदू बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश

डीएचएफएलच्या रिझोल्युशन प्लॅनला झटका, कर्जदाते लटकले, पैसे मिळण्यास विलंब होणार?