देशात सर्वात उंच शिवरायांच्या पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण, ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यास शिवप्रेमी उत्सुक!

शहरातील क्रांती चौकात उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आज रात्री दहा वाजता केले जाईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने तर पालकमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रत्यक्षरित्या सोहळ्यात सहभागी होतील.

देशात सर्वात उंच शिवरायांच्या पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण, ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यास शिवप्रेमी उत्सुक!
औरंगबादेत शिवजयंती उत्सवानिमित्त क्रांती चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 1:30 PM

औरंगाबादः शहरातील क्रांती चौक येथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Shivaji Maharaj Statue) आज अनावरण होत आहे. 18 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील सर्वात उंच असा हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्यामुळे या शिल्पामुळे मराठवाड्याची राजधानी आणि पर्यटन नगरी औरंगाबादच्या (Aurangabad City) शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रांती चौकातील या नव्या पुतळ्याची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी शिवप्रेमींची प्रतीक्षा सुरु होती. जानेवारी महिन्यात औरंगाबाद शहरात हा पुतळा दाखल झाल्यानंतर कधी एकदा महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं दर्शन होईल, याची वाट प्रत्येक औरंगाबादकर पहात होता. पुतळ्याचे अनावरण कधी करायचे, याबद्दल अनेक दिवस निर्णय होऊ शकला नाही. अखेर उद्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री दहा वाजता या पुतळ्याचे लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ऑनलाइन पद्धतीनं या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. तसेच शहरातील सर्वपक्षीय नेत्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

कसा असेल सोहळा?

शहरातील क्रांती चौकात उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आज रात्री दहा वाजता केले जाईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने तर पालकमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रत्यक्षरित्या सोहळ्यात सहभागी होतील. या कार्यक्रमासाठी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ढोल-ताशा, डीजे आणि आतिषबाजीला परवानगी देण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या अनावरणामुळे हजारो महिला व लहान मुले या ऐतिहासिक क्षणाला मुकणार आहे, या बद्दल खंत व्यक्त केली जात आहे.

शिवरायांच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये काय?

औरंगाबादेत दिमाखात उभ्या असलेला शिवरायांच्या पुतळा हा देशातील सर्वोच्च अश्वारुढ पुतळा आहे. – पुतळ्याची चौथऱ्यासहित उंची 52 फूट आहे. – फक्त पुतळ्याची उंची 21 फूट आहे. – शिवरायांच्या पुतळ्याचे वजन 07 मेट्रिक टन एवढे आहे. – शिवरायांचे हे शिल्प घडवण्यासाठी 98 लाख रुपये खर्च करण्यात आला. – चौथऱ्याच्या सुशोभिकरणासाठी 2.55 कोटी रुपये खर्च झाला. – अशा प्रकारे शिवरायांचा पुतळा आणि चौथऱ्याचे सुशोभिकरणासाठी अंदाजे 3.53 कोटी रुपये खर्च झाले आहेत. – पुतळ्याभोवती वापरलेला धातू ब्राँझ आहे. – चौथऱ्याचे सुशोभिकरण करताना प्रतापगडावरून प्रेरणा घेण्यात आली आहे. चौथऱ्याभोवतीच्या कमानीत 24 मावळ्यांच्या मूर्ती आहेत. तसेच हत्तींच्या सोंडेतून पाण्याचे कारंजे सोडण्यात आले आहेत.

इतर बातम्या-

Zodiac | ‘सुवर्णकाळ’, पुढचा 1 महिना फक्त तुमचाच, तुम्ही म्हणाल तसंच होणार , या 4 राशींसाठी शुभ काळ

जनतेला वास्तव कळावं यासाठी कोर्लईला जातोय : किरीट सोमय्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.