औरंगाबाद | गेल्या काही दिवसांपासून शहरातील (Aurangabad city) नागरिकांना बेसावध क्षणी कोणतीही थाप मारून त्यांच्याकडील पैसे तसेच दागिने चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वीच पैठणहून आलेल्या एका महिलेला रस्त्यात गाठून पुढे दंगल सुरु आहे, तुम्ही सुरक्षित नाहीत. तुम्हाला मारतील अशी धमकी देत महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी एका महिलेला गुप्तदान (Secrete donation) करण्याचे नवस बोलले आहे, असे म्हणत एका भामट्याने तिला रोख रक्कम दिली. मात्र या पैशांभोवती तात्पुरते तुमच्या अंगावरील दागिने लपेटून घेण्यास सांगितले. त्यानंतर ते फुलांच्या पिशवीत ठेवण्याचा बहाना करत लुटारुने चालाखीने तब्बल सहा तोळे सोने लंपास केले. हा प्रकार घडल्यानंतर अर्ध्या तासाने महिलेच्या लक्षात आला. त्यानंतर या प्रकरणी पोलीस (Aurangabad police) तक्रार दाखल करण्यात आली. अशा प्रकारे थापा मारून लुटण्याची मागील दहा दिवसातील ही तिसरी घटना आहे.
शहरातील न्यू श्रेयनगर या भागात सीमा मिलिंद संकलेचा यांचे स्टेशनरीचे दुकान असून पती खासगी नोकरी करतात. समी दुकानात असताना बुधवारी दुपारी एक अनोळखी व्यक्ती आला. तो सीमा यांना म्हणाला, माझी देवावर श्रद्धा असून मला गुप्तदान करायचे आहे. मात्र ते एका महिलेच्या हाताने करायचे असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही आसपासच्या कोणत्याही मंदिरात माझ्या वतीने एक हजार रुपये दान करा..’ सीमा यांना विश्वासत घेतल्यानंतर त्या मंदिरात येण्यास तयार झाल्या. त्याने दिलेल्या हजारांच्या नोकांवर त्याने वजनदार मौल्यवान वस्तू ठेवण्यास सांगितले. सीमा यांनी चार तोळ्याच्या बांगड्या आणि दोन तोळ्याचे मंगळसूत्र ठेवले. लुटारूने ते दागिने नोटांना बांधून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर दान करताना फक्त नोटा टाका आणि दागिने काढून घ्या म्हणाला. त्याने खिशातून फुलांची पिशवी काढून दागिने ठेवण्याचे नाटक केले. व पिशवी सामा यांच्या हातात दिली. एका तासाने ती पिशवी उघडायला सांगितले.
सीमा यांनी सदर इसम गेल्या नंतर अर्ध्या तासात पिशवी उघडली असता त्यांना धक्काच बसला. त्यात दागिन्यांऐवजी बिस्टिकचा पुडा आढळला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. सदर घटनेची माहिती कळताच उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथील निरीक्षक गीता बागवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या भामट्याचा शोध घेतला जात आहे.
इतर बातम्या-