Aurangabad | मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेची तयारी, खैरे, दानवेंच्या हस्ते स्तंभपूजन, सांस्कृतिक मंडळ मैदान दणाणून सोडणार!

शहरातील रस्ते, पाणी, वीजसमस्यांमुळे हैराण नागरिक सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जनतेची नाराजी दूर करण्यासाठी काय आश्वासनं देतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Aurangabad | मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेची तयारी, खैरे, दानवेंच्या हस्ते स्तंभपूजन, सांस्कृतिक मंडळ मैदान दणाणून सोडणार!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 11:35 AM

औरंगाबादः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची येत्या 08 जून रोजी औरंगाबादेत (Aurangabad Rally)सभा होणार आहे. या निमित्त औरंगाबादेतील शिवसेनेचे नेते कामाला लागले आहेत. आज माजी खासदार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या हस्ते द्वज पूजन करण्यात आले. शिवसेना आमदार अंबादास दानवे हेदेखील या पूजेला उपस्थित होते. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर खैरेंच्या हस्ते शिवसेनेच्या ध्वजाची पूजा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा ऐतिहासिक होईल, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. पुढील आठ दिवसांवर शिवसेनेची ही सभा येऊन ठेपली असल्याने शहरातील नागरिक तसेच इतर पक्षांचेही शिवसेनेच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष आहे.

.

‘लाखोंचा जनसमुदाय येणार’

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या पूजनानंतर आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. औरंगाबादमधील शिवसेनेच्या शाखेची वर्षपूर्ती 08 जून रोजी आहे. त्यानिमित्त ही सभा आयोजित केली असून या वेळी लाखोंची उपस्थिती राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेच्या तयारीला आम्ही सुरुवात केली असून विधीयुक्त पूजा करण्यात आली .आम्ही हिंदू आहोत, त्यामुळे शास्त्र नियमानुसार काम करतो, असंही खैरेंनी आवर्जून सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठका सुरु असून सर्व आमदार-पदाधिकारीही या कामात आहेत, या सभेला निश्चितच लाखोंची गर्दी होईल, असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

आमदार अंबादास दानवे यांची पोस्ट

मनसेच्या सभेला प्रत्युत्तर देणार का?

मागील महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबादेत झाली. हिंदुत्वासाठी आग्रही भूमिका घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभेपूर्वीच वातावरणनिर्मिती केली होती. त्यानंतर सभेच मशिदींसमोरील भोंगे हटवण्याचे आवाहन केले. त्यानंतरही राज ठाकरेंच्या आवाहनाचे पडसाद अनेक दिवस उमटले. आता शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबादेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेण्याचे जाहीर केले आहे. शहरातील रस्ते, पाणी, वीजसमस्यांमुळे हैराण नागरिक सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जनतेची नाराजी दूर करण्यासाठी काय आश्वासनं देतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला काय प्रत्युत्तर देतील, याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.