Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | उद्धव ठाकरेंच्या सभेची गर्दी विरोधकांनी मोजत बसावी, औरंगाबादेतही जागा पुरणार नाही, अंबादास दानवेंचा दावा काय?

उद्ध ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी विविध कॉलन्यांमध्ये जाऊन नागरिकांना निमंत्रण पत्रिका वाटत आहेत. सभेच्या निमित्ताने लोकांच्या घरी जाण्याची, त्यांची भेट घेण्याची ही संधी असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

Aurangabad | उद्धव ठाकरेंच्या सभेची गर्दी विरोधकांनी मोजत बसावी, औरंगाबादेतही जागा पुरणार नाही, अंबादास दानवेंचा दावा काय?
शिवसेना आमदार अंबादास दानवे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 2:43 PM

औरंगाबादः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सभेला किती लोक येतील, कसे बसतील, याची चिंता आम्हाला नाही. सभेची गर्दी विरोधकांनी मोजत बसावी, असा टोला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे. येत्या 08 जून रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला झालेल्या गर्दीपेक्षाही जास्त लोक शिवसेनेच्या सभेला (Shiv Sena Rally) येतील असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता. आता ही सभा चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सभेच्या आयोजनासाठी औरंगाबाद शिवसेनेचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत. आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदी नेते शहरात ठिकठिकाणी फिरून नागरिकांना सभेचं आमंत्रण देत आहेत. ही सभा ज्या ठिकाणी होणार आहे, त्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ग्राउंडवरदेखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. आजच उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांची औपचारिक परवानगी मिळाली आहे.

ऑक्टोबर 2019 नंतर प्रथमच जाहीर सभा

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही औरंगाबादमधील पहिलीच सभा आहे. त्यामुळे औरंगाबादच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, असं आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले, या सभेत येणारे लोक आमच्या शुभचिंतकांनी मोजत बसावे. पण मैदानच नव्हे तर या शहरातही जागा उरणार नाही, एवढे लोक येतील.

हे सुद्धा वाचा

गल्ल्या-गल्ल्यांमध्ये सभेचं निमंत्रण

उद्ध ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी विविध कॉलन्यांमध्ये जाऊन नागरिकांना निमंत्रण पत्रिका वाटत आहेत. सभेच्या निमित्ताने लोकांच्या घरी जाण्याची, त्यांची भेट घेण्याची ही संधी असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. त्यामुळे याची एकही संधी आम्ही सोडत नाहीयेत. बँका, बाजारपेठा, व्यायामशाळा, वॉकिंग ट्रॅक आदी सर्वत्र शिवसैनिक फिरत आहोत, असं दानवेंनी सांगितलंय.

फडणवीसांना उत्तर देणार का?

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये भाजपने मोठा जलाक्रोश मोर्चा काढला होता. आता उद्धव ठाकरे आगामी सभेतून फडणवीसांना प्रत्युत्तर देणार का, असा सवाल विचारला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी उत्तर देण्याची गरज नाही. त्यासाठी आम्ही शिवसैनिकच पुरेसे आहोत. उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व आहे. त्यांना त्या पातळीवरील मान्यता आहे. पण फडणवीस हे व्यथित झालेले नेते आहेत. शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी उद्धव ठाकरे येथे येत आहेत, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.