Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार रमेश बोरनारे यांचा राजीनामा घ्यावा, भाजप महिला आघाडी आक्रमक, काय आहे भूमिका?

वैजापूर येथील भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांनी वैजापूर पोलिसांनी भेट घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींकडून महिलांना मारहाण होत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत आहे, त्यामुळे आमदार बोरनारे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आमदार रमेश बोरनारे यांचा राजीनामा घ्यावा, भाजप महिला आघाडी आक्रमक, काय आहे भूमिका?
भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 9:26 AM

औरंगाबादः भाजपच्या कार्यक्रमात का गेलात म्हणत भावजयीला बेदम मारहाण करणाऱ्या वैजापूरच्या शिवसेना आमदाराविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे. वैजापूरचे शिवसेना (Vaijaur Shiv Sena) आमदार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) आणि कुटुंबियांना जनतेच्या सुरक्षेचा विसर पडला असून ते मनमर्जीप्रमाणे वागत आहेत. त्यामुळेच त्यांनी महिलेला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रकरणी गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच आमदार बोरनारे यांचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीने केली आहे. या प्रकरणी आज सोमवारी भाजप महिला मोर्चाचे शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि आयजी याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहेत आरोप?

18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आमदार रमेश बोरनारे यांचे चुलत भाऊ आणि त्यांची पत्नी उपस्थित होती. भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती का लावली, या गोष्टीचा राग मनात धरत आमदार रमेश बोरनारे यांच्यासह दहा जणांनी चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. या घटनेचे राजकीय तसेच सामाजिक पडाद उमटत आहेत.

भाजपची भूमिका काय?

– आमदार बोरनारे यांच्यावर 307 हे कलम लावण्यात यावे, मारहाण झालेल्या महिलेला दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले. मेडिकलसाठीही तीन तास ताटकळत ठेवले. हे सगळं असताना तिच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा आमदाराच्या दबावाखाली दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्याची ही प्रक्रिया 15 मिनिटातच कशी झाली, असा सवाल भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष अॅड. माधुरी अदवंत यांनी केला आहे. – तसेच वैजापूर येथील भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांनी वैजापूर पोलिसांनी भेट घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींकडून महिलांना मारहाण होत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत आहे. पोलीस दबावात असून अॅट्रॉसिटीची शहानिशा न करता गुन्हा दाखल केला, यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आ. बोरनारे यांनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला-रिपाइं

दरम्यान, आमदार बोरनारे कुटुंबाने अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचा स्वतःच्या कौटुंबिक वादासाठी गैरवापर केला आहे. भावजयीला राजकीय द्वेषापोटी मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर खासगी सचिवाला पुढे करून मारहाण झालेल्या फिर्यादीवरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले. त्यामुळे जयश्री बोरनारे यांच्यावर दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करून त्याचा दुरुपयोग केल्या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे रिपाइंचे युवक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी केली आहे. गृहमंत्री, पोलीस अक्षीक्षकांकडे त्यांनी हे निवेदन सादर केले.

इतर बातम्या-

सांगलीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप, शहीद रोमित चव्हाण यांच्या अंत्यसंस्काराला जनसागर, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Sanjay Raut | तुम्ही जी नावं घेतली त्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची भेट घेण्याची गरज नाही

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....