Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | भावजयीला मारहाण; आमदार बोरनारे प्रकरणी सात दिवसात अहवाल सादर करा, पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील भाजपच्या कार्यक्रमात आमदार बोरनारे यांच्या भावजय जयश्री बोरनानरे उपस्थित होत्या. तुम्ही भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या, असा सवाल करत आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार जयश्री बोरनारे यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात केली होती.

Aurangabad | भावजयीला मारहाण; आमदार बोरनारे प्रकरणी सात दिवसात अहवाल सादर करा, पोलीस महानिरीक्षकांचे आदेश
शिवसेना आमदार रमेश बोरनारे
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 10:14 AM

औरंगाबादः वैजापूर शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी भावजयीला मारहाण केल्याप्रकरणी येत्या सात दिवसात चौकशीचा अहवाल सादर करा, असे आदेश देण्यात आले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना (K. M. Mallikarjun Prasanna) यांनी पोलीस अधीक्षक निमित गोयल यांना हे आदेश दिले आहेत. कायदा सर्वांसाठी समान असतो, त्यामुळे या प्रकरणात दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असं अश्वासन पोलीस महानिरीक्षकांनी दिलं आहे. राजकीय दबावापोटी वैजापूरचे पोलीस ठोस भूमिका घेत नाहीयेत, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

वैजापूर पोलिसांच्या भूमिकेवर संशय

18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील कार्यक्रमात आमदार बोरनारे यांच्या भावजय जयश्री बोरनानरे उपस्थित होत्या. तुम्ही भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या, असा सवाल करत आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार जयश्री बोरनारे यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आमदार बोरनारे यांनी खासगी सचिवाला पुढे करून मारहाण झालेल्या फिर्यारीदवरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले, असाही आरोप केला जात आहे. भाजपने वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखल घेतली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी पोलिसांनी भेट घेतली असता राजकीय दबावापोटी पोलीस सौम्य कारवाई करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. या प्रकरणी पीडितेविरुद्धचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेऊन आमदार बोरनारे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्बा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

आमदार बोरनारे प्रकरणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रस्नना यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. तसेच भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करीत पीडितेविरुद्धचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा व आमदार बोरनारे यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध विनय भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. या प्रकरणी पोलीस महानिरीक्षकांनी सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निमित गोयल यांना दिले आहेत.

इतर बातम्या-

भव्यदिव्य सेट, सुरेल गाण्यांचा नजराणा, आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी प्रेक्षकांच्या भेटीला

सुगंधी चंदनाची इनोव्हातून तस्करी; नाशिकमध्ये ‘पुष्पा’ला बेड्या, कितीचे घबाड सापडले?

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.