PHOTO | ट्रकचा चेंदामेंदा, रस्त्यावर लाल चिखल! औरंगाबादमधील वैजापुरात विचित्र अपघात कसा घडला?

गंगापूर चौफुली मार्गावर सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बाबरगाव येथील रहिवासी वैजिनाथ सावंत हे पिकअप गाडीने नाशिक येथन बाबरगावला जाताना चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी हा अपघात झाला.

PHOTO | ट्रकचा चेंदामेंदा, रस्त्यावर लाल चिखल! औरंगाबादमधील वैजापुरात विचित्र अपघात कसा घडला?
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 10:39 AM

औरंगाबाद: जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात (Vaijapur) विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर वैजापूर शहरातील गंगापूर चौफुली मार्गावर सर्वत्र लाल रंगाचा चिखल पहायला मिळाला. याचं कारण म्हणजे ज्या ट्रकचा ( truck Accident) अपघात झाला त्यात रंगांच्या टाक्या भरलेल्या होत्या. भरधाव वेगानं येणारा हा ट्रक चौफुलीजवळील पिकअप गाडीवर येऊन आदळला आणि ट्रकमधील टाक्या क्षणात एकानंतर एकावर एक आदळून रस्त्यावर पसरल्या. त्यातील सगळे रंग रस्त्यावर सांडले. अपघातातील (Aurangabad accident) ट्रक चालक जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रस्त्यावरचे हे दृश्य पाहण्यासाठी गंगापूर चौफुलीजवळ नागरिकांची गर्दी दिसून आली. स्थानिक पत्रकार प्रशांत त्रिभूवन यांनी या अपघाताची छायाचित्र टिपली.

Vaijapur Accident

नेमकी घटना काय घडली?

गंगापूर चौफुली मार्गावर सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बाबरगाव येथील रहिवासी वैजिनाथ सावंत हे पिकअप गाडीने नाशिक येथन बाबरगावला जाताना चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यांनी पिकअप गाडी एका हॉटेलसमोर उभी केली त्यावेळी गंगापूर रस्त्याने येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने या पिकअप गाडीला जोरदार धडक दिली.

Vaijapur Accident

पिकअप गाडीवर भरधाव वेगानं येणारा ट्रक आदळला. त्यानंतर पिकअप गाडीसह ट्रक रस्त्यावर घसरतच पुढे गेला. यामुळे पिकअप गाडी पूर्णपणे दबली.

Vaijapur Accident

या अपघातात पिकअप गाडी आणि ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला. तसेच ट्रकमधील रंगांच्या टाक्याही रस्त्यावर अस्ताव्यस्त येऊन पडल्या आणि त्यातील रंगांचे लोट रस्त्यावर वाहू लागले.

Vaijapur Accident

स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावरील या रंगांच्या टाक्या आणि रंग बाजूला करण्यात आला. जखमी ट्रक चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Vaijapur Accident

इतर बातम्या-

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Kolhapur : कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, प्रस्थापितांचं टेन्शन वाढलं, हरकती नोंदवण्याचं आवाहन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.