VIDEO | औरंगाबादेत पुन्हा राडा, 8 ते 10 जणांच्या टोळक्याची तरुणाला मारहाण, गंगापूर परिसरात दहशत
शहरातील अनेक ठिकाणी नशा करणाऱ्या तरुणांचे अड्डे असून नशेबाजांकडून खून, हाणामाऱ्याच्या घटना घडत आहेत, असे सातत्याने समोर येत आहे. मात्र या प्रकारांवर आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबादः तीन दिवसांपूर्वीच औरंगाबादमधील सातारा परिसरात एका टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच राडा (Aurangabad Rada) झाल्याचं पहायलं मिळतंय. नुकताच झालेला हा राडा गंगापूर परिसरातील असून आधीच्या घटनेप्रमाणेच याही घटनेत एकाच तरुणावर आठ ते दहा जाणांनी हल्ला करून त्याला बेदम मारहाण (young man beaten) केल्याचं दिसंतय. या जमावापैकी प्रत्येकाच्या हातात दांडुका असून अत्यंत गलिच्छ शिवीगाळ करत हे लोक तरुणाला मारत आहेत. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ तयार केला जात असल्याचं टोळक्याला माहिती असून कॅमेऱ्याकडे पाहून अधिकच मारहाण केली जात होती. औरंगाबादेत आठवडाभरातच अशा प्रकारे दहशत पसरवणारा दुसरा प्रसंग घडला असून गुंडगिरी वाढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा वचक (Police) राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
कुठे घडली घटना?
दरम्यान, नुकतीच घडलेली ही घटना गंगापूर येथील असल्याची माहिती हाती आली आहे. आठ ते दहा जणांच्या जमावाने हातात चक्क दंडूके घेऊन एका तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर एकानंतर एक असे, या लोकांनी लाथा-बुक्क्यांनीही त्याला मारहाण केली. ही घटना घडत असताना परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यानी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर ही मारहाण थांबवण्यात आली. घटनेत मारहाण करणाऱ्या तरुणांची गंगापूर परिसरात दहशत असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे.
गुंडगिरीचा कळस, पोलीसांवर प्रश्नचिन्ह!
औरंगाबाद शहरात मागील काही महिन्यांपासून गुंडगिरीतून घडलेल्या घटनांनी कळस गाठलेला दिसतोय. मागील आठवड्यातच शहरातील बीड बायपास रोड परिसरातील सुधाकर नगरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. जुन्या वादातून तरुणावर सात ते आठ जणांच्या जमावानं हल्ला केला होता. लाठ्या-काठ्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर आता ही घटना पुढे आली आहे. शहरातील अनेक ठिकाणी नशा करणाऱ्या तरुणांचे अड्डे असून नशेबाजांकडून खून, हाणामाऱ्याच्या घटना घडत आहेत, असे सातत्याने समोर येत आहे. मात्र या प्रकारांवर आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
इतर बातम्या-