Aurangabad | लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या वाहनानं अचानक ब्रेक दाबला, कार थेट धडकली, चालकाचा मृत्यू

पिकअपच्या चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कळसकर यांची कार थेट पिकअपला पाठिमागून धडकली. कार पिकअपमध्ये घुसल्यामुळे या मालवाहू वाहनातील लोखंडी सळ्या आणि अँगल कळसकर यांच्या कारच्या आरपार घुसल्या.

Aurangabad | लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या वाहनानं अचानक ब्रेक दाबला, कार थेट धडकली, चालकाचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 10:04 AM

औरंगाबादः शहरातील वाळूज परिसरात भीषण अपघातात (Terrible Accident) एका ठेकेदाराचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद ते नगर रोडवरील (Aurangabad- Nagar) कायगाव जवळ ही घटना घडली. मालवाहतूक करणारे चारचाकी वाहन आणि बलेनो कार यांच्यात हा भयंकर अपघात झाला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेचं दृश्य अत्यंत विदारक होती. माल वाहतूक करणाऱ्या पिकअपला कार पाठिमागून धडकली. यामुळे पिकअप वाहनातील लोखंडी सळ्या आणि अँगल कारमधील ठेकेदाराच्या कारच्या आरपार घुसल्या. या अपघात ठेकेदाराला गंभीर जखम झाली. मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू (Accident Death) झाला.

नेमकी कुठे घडली घटना?

या अपघाताविषयी पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, वाळूज येथील अविनाथ कॉलनीत राहणारे किशोर नानासाहेब कळसकर हे वाळूज एमआयडीसी आणि परिसरातील उद्योगांना कामगार पुरवण्याचे काम करत होते. बुधवारी रात्री कळसकर हे बलेनो कारमधून औरंगबाद-नगर रोडने जात होते. त्याचवेळी पिकअपच्या चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कळसकर यांची कार थेट पिकअपला पाठिमागून धडकली. कार पिकअपमध्ये घुसल्यामुळे या मालवाहू वाहनातील लोखंडी सळ्या आणि अँगल कळसकर यांच्या कारच्या आरपार घुसल्या. यात किशोर कळसकर हे गंभीर जखमी झाले. बजाज नगर येथील खसागी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. मात्र जखम अधिक गंभीर असल्याने त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शिवसैनिकाच्या कारने 4 वर्षीय चिमुकली ठार

अन्य एका अपघाताच्या घटनेत चार वर्षीय मुलगी ठार झाली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये बुधवारी सभा झाली. या सभेला आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या भरधाव कारने एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीचा तोल जाऊन त्यांची चार वर्षीय चिमुकली लांब फेकली गेली. क्रांती चौकातून विमानतळाच्या दिशेने एक कार जात होती. एपीआय कॉर्नर येथे मोपेड दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला कारने उडवले. यात त्यांची मुलगी लांब फेकली गेली आणि भरधाव वेगाने आलेल्या कारचं एक चाक तिच्या अंगावरून गेलं. स्थानिकांनी धाव घेत तिला सेव्हन हिल्स येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, ज्या कारमुळे हा अपघात झाला, ती उस्मानाबाद येथील शिवसैनिकांची होती, असं सांगण्यात येत आहे. नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या स्वाधीन केलं. सदर घटनेत कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.