Aurangabad | विस्कळीत पाणीपुरवठ्याची घडी बसवण्याचे प्रयत्न, मुंबई मनपा आणि आयआयटीचे मार्गदर्शन घेणार

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या नियोजनासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील महत्त्वाचे अधिकारी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतील.

Aurangabad | विस्कळीत पाणीपुरवठ्याची घडी बसवण्याचे प्रयत्न, मुंबई मनपा आणि आयआयटीचे मार्गदर्शन घेणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 10:00 AM

औरंगाबाद| शहरातील जीर्ण झालेल्या जुन्या पाणीपुरवठा योजनेमुळे विविध भागांतील पाणीपुरवठा (Water Supply) विस्कळीत झालेला आहे. अनेकदा शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटते, त्यानंतर पुढील दोन दिवस पाण्याचे वेळापत्रक बिघडते. आधीच शहरातील बहुतांश भागात सहा ते आठ दिवसांनी पाणी येते, त्यात अशी अडचणी आल्यामुळे नागरिकांना (Aurangabad citizens) मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेचे हे हाल असताना नव्या योजनेच्या कामाला म्हणावी तेवढी गती मिळत नाहीये. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपा प्रशासकांनी (AMC Administrator) पुढाकार घेतला आहे. यासाठी मुंबई मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मनपाचे अधिकारी पाणी वितरण आणि नियोजनाबाबत लवकरच चर्चा करणार आहेत. तसेच आयआयटी पवईचे मार्गदर्शनही यासाठी घेतले जाणार आहे. ज्या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होईल, त्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

जलबेल अॅपवरून माहिती मिळणार

शहरातील विविध भागात पाणी वितरणाची माहिती मिळावी, यासाठी जलबेल अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना पाणी कधी येणार, या बद्दलची माहिती मिळणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले.

पुढील आठवड्यात मुंबईला जाणार

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या नियोजनासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील महत्त्वाचे अधिकारी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. यासाठी पुढील आठवड्यात ते मुंबईला रवाना होतील. तसेच एमजेपीचे सेवानिवृत्त चार ते सहा अधिकारी कामावर घेण्यात येऊन त्यांच्यावर वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. पाणी वितरणातील दोष दूर करण्यासाठी पीएमस नियुक्त करून मुंभई येथील पवईच्या आयआयटी संस्थेचे प्रा. सतीश बलाराम अग्निहोत्री यांच्याशी चर्चा करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वितरणाचे नियोजन केले जाईल. साधारण महिनाभरानंतर याचे परिणाम दिसतील, असे आश्वासन मनपा प्रशासकांनी दिले आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागात अनेक वर्षांपासून असलेल्या अभियंत्यांसह काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेतही आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वितरण व्यवस्थेबद्दलची बारकाईने माहिती असूनही त्यांच्याकडून उपाययोजना राबवल्या जात नाहीत, अशी खंत पांडेय यांनी व्यक्त केली.

इतर बातम्या-

Skin care : त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी कच्च्या हळदीचा एक तुकडाच फायदेशीर!

‘आई माऊलीचा उदो उदो’ जयघोषात एकविरा देवी उत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.