धक्कादायक: विषारी औषधांच्या दोन बाटल्या पिऊन तरुणाची आत्महत्या, औरंगाबादेत Video Viral!

कन्नडमधीलच सुनील ढगे असं या तरुणांचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो अत्यंत निराश अवस्थेत होता. यामुळे कुटुंबियांना त्याचं टेंशन होतं, याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे.

धक्कादायक: विषारी औषधांच्या दोन बाटल्या पिऊन तरुणाची आत्महत्या, औरंगाबादेत Video Viral!
औरंगाबादेत विष घेऊन तरुणाची आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 9:30 AM

औरंगाबादः मोबाइलवर विषप्राशन करण्याचा व्हिडिओ (Suicide Video) तयार करत एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून तो पाहताना भल्या-भाल्यांना हादरा बसू शकतो. माझ्यामुळे कुटुंबियांना टेंशन येत असून त्यासाठीच मी जीवन संपवतोय, अशी वाक्य हा तरुण व्हिडिओमध्ये बोलतो. त्यानंतर एकानंतर अशा दोन्ही विषाच्या बाटल्यांमधील विष ग्लासमध्ये ओतून ते पिऊन घेतो. तसेच माझ्या या कृतीसाठी मीच जबाबदार आहे, इतर कुणालाही जबाबदार धरू नये, त्यांना त्रास देऊ नये, अशी वारंवार विनवणी तो व्हिडिओतून करतो. विषप्राशन केल्यानंतर तरुणाने स्वतःच हा व्हिडिओ बंद केल्याचे दिसते. पण आत्महत्येच्या (Aurangabad Suicide) या व्हिडिओमुळे औरंगाबादमध्ये खळबळ माजली आहे.

कन्नड तालुक्यातील तरुणाची आत्महत्या

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो नेमका कुणाचा आहे, याचा शोध घेतला गेला. मोबाइलवर व्हिडिओ तयार करून आत्महत्या केल्याची ही घटना कन्नड तालुक्यातील आहे. तालुक्यातील एका निर्जन स्थळी तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासानंतर या तरुणाची ओळख पटली. कन्नडमधीलच सुनील ढगे असं या तरुणांचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो अत्यंत निराश अवस्थेत होता. यामुळे कुटुंबियांना त्याचं टेंशन होतं, याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे.

व्हिडिओनंतर काही वेळातच मृत्यू

दरम्यान व्हिडिओतील ठिकाणाचा माग घेत, पोलीस आणि तरुणाचे नातेवाईक सदर स्थळावर पोहोचले. तरुणाला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचे प्राण गेले गेले होते. विषप्राशन केल्यानंतर काही वेळातच त्याचे प्राण गेले होते, असं डॉक्टरांनी सांगितलं. सुनीलच्या या कृत्यामुळे कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे.

विवेकबुद्धी जागी ठेवा

सुनीलने आत्महत्या केल्याचा हा व्हिडिओ औरंगाबादेत प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र अशा प्रकारची नकारात्मक आणि आयुष्याशी संपवण्याची भयंकर कृती आम्ही आमच्या वाचकांना, प्रेक्षकांना दाखवू शकत नाहीत. पण काय करू नये, हे सांगण्यासाठी ही बातमी देणंही माध्यम म्हणून कर्तव्य आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक नकारात्मक व्हिडिओ येत असतात, पण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून ते न पाहण्याचा निर्णयही आपणच घेऊ शकतो. चुकून पाहिलाच तर पुढील माणसापर्यंत, ग्रुपपर्यंत तो न पाठवण्याचा पुढाकार घेणंही आपल्याच हाती आहे.

इतर बातम्या-

स्टाईल आयकॉन Kriti Sanon चे हटके स्टाईल टॉप 5 फोटो, तुम्हालाही तिची स्टाईल कॉपी करावीशी वाटेल!

Worli Koliwada येथे होळीचा उत्साह, Amit Thackeray यांच्या हस्ते होलिकादहन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.