Crime | बीडमध्ये हवाला रॅकेट उध्वस्त, लाखोंची बेहिशेबी रक्कम जप्त, तिघांना बेड्या!

शहरात तीन ठिकाणी टाकलेल्या या धाडींमध्ये रोख 51 लाखांसह पैसे मोजण्याचं यंत्र, मोबाइल आणि इतर साहित्यदेखील जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन व्यवस्थापकांना अटक केली आहे.

Crime | बीडमध्ये हवाला रॅकेट उध्वस्त, लाखोंची बेहिशेबी रक्कम जप्त, तिघांना बेड्या!
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 11:47 AM

बीडः जिल्ह्यातील केज तालुक्यात मोठ्या हवाला रॅकेटचा (Hawala Racket) पर्दाफाश करण्यात आला. सोमवारी रात्री पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. दुप्त माहितीच्या आधारे केजमधील (Kej City) तीन ठिकाणी पोलिसांनी छापे मारले. याठिकाणी लाखो रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, हे आरोपी पैशांचा काळाबाजार करत होते. संबंधित आरोपी आयकर चुकवून (Income Tax) टोकन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरु असून त्यांच्याद्वारे इतर अवैध ठिकाणांची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

सोमवारी रात्री तीन ठिकाणी धाडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज शहरात विविध ठिकाणी हवाला रॅकेट सुरु असल्याची दुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी केज शहरातील कबाड गल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स आणि सिद्धीविनायक कॉप्लेक्ससमोरील एका ठिकाणी धाड टाकली. या तिन्ही ठिकाणी मिळून 51 लाख 26 हजार रुपयांची रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे.

तिघांना बेड्या

शहरात तीन ठिकाणी टाकलेल्या या धाडींमध्ये रोख 51 लाखांसह पैसे मोजण्याचं यंत्र, मोबाइल आणि इतर साहित्यदेखील जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन व्यवस्थापकांना अटक केली आहे. मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतिलाल पटेल आणि सुरज पांडुरंग घाडगे असं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे. संबंधित आरोपी आयकर चुकवून टोकन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या-

उद्धव ठाकरेंना सत्ता जाण्याची भीती म्हणूनच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत; दरेकरांचा हल्लाबोल

रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मोठे पाऊल

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.