बीडमध्ये कार झाडावर आदळली, वाळू माफियांवर कारवाईसाठी जाताना अपघतात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू, तहसीलदार जखमी

राक्षसभुवन ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता चांगल्या दर्जाचा असून हा भीषण अपघात सावळेश्वरच्या जवळपास झाला आहे. अपघात झाला तेव्हा कार भरधाव वेगात असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बीडमध्ये कार झाडावर आदळली, वाळू माफियांवर कारवाईसाठी जाताना अपघतात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू, तहसीलदार जखमी
अपघातात जखमी कार, मयत मंडळ अधिकारी नितीन जाधव
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 9:21 AM

बीडः गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाटा इथं रविवारी झालेल्या अपघातात (Beed accident) महसूल अधिकारी नितीन जाधव यांचा जागीच अपघात झाला. तर बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके जखमी झाले. रविवारी पहाटेच्या सुमारास राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाटा इथं हा अपघात झाला. अवैध वाळू उपसा (Illegal sand extraction) करून येणाऱ्या एका टिप्परचा पाठलाग करताना हायवा चालकाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी कार भरधाव वेगात (Car accident) होती, मात्र ऐनवेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार झाडावर आदळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अवैध वाहतुकीविरोधात कारवाईसाठी जात होते….

याविषयी अधिक माहिती अशी की, महसूल विभागाचे पथक अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात गोदापात्रात कारवाईसाठी गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई सुरु होती. यावेळी गेवराई तालुक्यातील सावळेश्वर फाटा परिसरात अवैध वाळू उपसा करून राक्षसभुवन येथून येणाऱ्या एका टिप्परचा पाठलाग सुरु होता. मात्र रस्त्यावरील एका हायवा चालकाने हुलकावणी दिल्याने पथकाचे कारवरील नियंत्रण सुटले. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार एका झाडावर आदळली. या अपघातात मंडळ अधिकाकरी तथा महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव नितीन जाधव यांचा मृत्यू झाला. तर बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके या अपघातात गंभीर जखमी झाले.

जखमी तहसीलदारांना पुण्यात हलवले

दरम्यान, या अपघातात बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सुरुवातीला जिल्हा प्राथमिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुणे येथे हलवण्यात आले. राक्षसभुवन ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता चांगल्या दर्जाचा असून हा भीषण अपघात सावळेश्वरच्या जवळपास झाला आहे. अपघात झाला तेव्हा कार भरधाव वेगात असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

ट्रिपल सीट बाईकस्वारांना ट्रकची धडक, दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याला रुग्णालयात नेताना मृत्यूने गाठले

Majhi Tujhi Reshim Gath : यश आणि नेहाची ‘ओम शांती ओम’ स्टाईल डेट, यश-नेहा प्रेमरंगी रंगले…

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.