Beed | क्षीरसागर पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ, बीड गोळीबार प्रकरण, कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला

जिल्हाधिकारी परिसरातील गोळीबारात सतीश बबन क्षीरसागर आणि सिद्दीक फारोकी हे दोघे जखमी झाले होते. याप्रकरणी डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि सेना नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. सत्र न्यायालयाने या दोघांचाही अंतरिम जामीन फेटाळला आहे.

Beed | क्षीरसागर पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ, बीड गोळीबार प्रकरण, कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला
डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या अडचणीत वाढ Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 12:43 PM

बीडः बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी क्षीरसागर पिता-पुत्रांच्या (Kshirsagar) अडचणीत वाढ झाली आहे. या घटनेत डॉ. भारतभूषण क्षीरसागर (Dr. Bharatbhushan Kshirsagar) आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला आहे. क्षीरसागर यांना चार दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती. परंतु सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे भारतभुषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जमिनीच्या वादावरुन क्षीरसागर परिवारात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबार(Beed collector office firing) झाला होता. यानंतर दोन्ही गटावर गुन्हे नोंद करण्यात आले होते.

काय घडली होती घटना?

25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार होऊन एकच खळबळ माजली होती. या ठिकाणी सतीश पवार हे जमिनीची खरेदी करण्यासाठी आले ोते. त्यावेळी तेथे आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे आपल्या समर्थकांसह हजर होते. यावेळी पवार आणि क्षीरसागर गटात बाचाबाची झाली. यावेळी गोळीबार झाला. यात सतीश बबन क्षीरसागर आणि सिद्दीक फारोकी हे दोघे जखमी झाले होते. याप्रकरणी डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि सेना नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. सत्र न्यायालयाने या दोघांचाही अंतरिम जामीन फेटाळला आहे.

आमदार धस यांचा जामीन मंजूर

दरम्यान, बीड जिल्ह्यातील दुसऱ्या एका प्रकरणात आमदार सुरेश धस यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र व्यायालयाने मंजूर केला आहे. माधुरी चौधरी यांनी आमदार धसांसह अन्य 38 जणांवर घराचे कंपाउंड वॉल न बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी आणखी कलमे वाढवली होती. मंगळवारी बीड येथील सत्र न्यायालयाने आमदार धस यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

इतर बातम्या-

Nashik Water Storage: नाशिकमध्ये झळा तीव्र; जिल्ह्यात फक्त 76 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.