मोठी बातमीः आमदार सुरेश धस यांच्यावर 1 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, विविध देवस्थानांची 450 एकर जमीन लाटली?

सुरेश धस यांनी महसूल मंत्री हे पद भोगल्यानंतर त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यांचा जामगाव रोडवरील बंगलाच जवळपास 60 कोटी रुपयांचा असून त्यातील सर्व बांधकामाचे सामान हे परदेशातून आयात करण्यात आले आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे.

मोठी बातमीः आमदार सुरेश धस यांच्यावर 1 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, विविध देवस्थानांची 450 एकर जमीन लाटली?
आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 5:53 PM

औरंगाबाद: बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी आष्टी तालुक्यातील इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा गैर व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराखाली ही माहिती उघड झाली आहे. आष्टी येथील देवस्थाने आणि मशिदीच्या इनाम जमिनींमध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून आणि महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे जवळपास 1000कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे (Ram Khade) आणि अॅड असीम सरोदे (Asim Sarode) यांनी केला आहे. विविध देवस्थानांच्या तब्बल 450 एकर जमीन लाटल्याचा ठपका धस यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच जमिनीच्या व्यवहारात शासनाचा महसूल बुडवण्यात आला असून सामान्य माणसाची फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

कोणत्या जमिनींमध्ये गैरव्यवहार झाला?

माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी जारी केलेल्या एका पत्रकानुसार, खर्डा येथील विठोबा देवस्थान, आष्टीतील पिंपळेश्वर महादेव, मानूर येथील श्री विरुपाक्ष स्वामी गुरू, श्री गिरीस्वामी मठ, चिंचपूर दर्गा येथील जमिनींबाबत गैरव्यवहार झाल्याच आरोप करण्यात आळा आहे. देवस्थानांच्या व मशिदींच्या जमिनी उपभोगत होते, त्यांच्याकडून खूपच अल्पदरात इनाम जमिनी विकत घेऊन त्याच्यावर प्लॉटिंग सुरु केली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारे वक्फ बोर्ड व धर्मादाय आयुक्त यांची पूर्व परवानगी घेतलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. या जमिनी बळकावण्यासाठी चुकीची व खोटी कागदपत्रे पुरवण्यात आली आहे तसेच सर्व रोजनामे एकाच दिवशी तयार करुन खोटे रेकॉर्ड तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महसूल मंत्रीपदानंतर धस यांच्या संपत्तीत वाढ- राम खाडे

सुरेश धस यांनी महसूल मंत्री हे पद भोगल्यानंतर त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यांचा जामगाव रोडवरील बंगलाच जवळपास 60 कोटी रुपयांचा असून त्यातील सर्व बांधकामाचे सामान हे परदेशातून आयात करण्यात आले आहे, असा आरोप राम खाडे यांनी केला आहे. या गैर व्यवहारांमध्ये मच्छिंद्र मल्टीस्टेट कॉ. क्रेडिट सोसायटीचे, आयसीआयसीआय बँकेचे डीडी वापरण्यात आले आहेत. सुरेश धस हे मल्टीस्टेट कॉ. चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी या कार्यकारी संचालिका आहेत.

ED कडे तक्रार करणार- राम खाडे

आमदार सुरेश धस यांनी आपल्या ताब्यातील मच्छीनंद्र मल्टीस्टेट कॉ. बँक मोठ्या रकमा फिरवण्यासाठी वापरली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंग गुन्ह्यासाठी वेगळी तक्रार राम खाडे ईडीकडे करणार आहेत. या बेकायदेशीर जमीन व्यवहार प्रकरणी माहिती व पुरावे राम खाडे व अब्दुल गनी यांनी अँटी करप्शन ब्युरोला दिले आहेत. तसेच सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इतर बातम्या-

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बड्या लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावतही जखमी?

Nanded: गाडीपुरा भागात रात्री दगडफेक, दोघे गंभीर जखमी, घरांचे नुकसान, 13 अटकेत, नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.