मंदिरं उघडताच औरंगाबादेत भाजपचा आनंदोत्सव, केंद्रीय मंत्री कराड यांच्या उपस्थितीत गजानन महाराज मंदिरात आरती
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मंदिरं तसेच धार्मिक स्थळं सुरु करण्यात आली आहेत. औरंगाबाद शहरातदेखील सर्व धार्मिक स्थळं खुली करण्यात आल्यामुळे भाजपने आनंदोत्सव साजरा केला आहे. शहरातील गजानन महाराज मंदिरात आज भाजप नेत्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आरती केली.
औरंगाबाद : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मंदिरं तसेच धार्मिक स्थळं सुरु करण्यात आली आहेत. औरंगाबाद शहरातदेखील सर्व धार्मिक स्थळं खुली करण्यात आल्यामुळे भाजपने आनंदोत्सव साजरा केला आहे. शहरातील गजानन महाराज मंदिरात आज भाजप नेत्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आरती केली. यावेळी मंत्री भागवत कराड, आमदार अतुल सावे, तसेच भाजपचे शहराध्यक्ष संयज केनेकर तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप नेत्यांनी केली गजानन महाराज मंदिरात पूजा
कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्व मंदिर तसेच इतर धार्मिक स्थळे मागील कित्येक महिन्यांपासून बंद होते. मात्र, आज म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व मंदिरे तसेच सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आजपासून भाविकांना मंदिरात प्रत्यक्षपणे जाऊन देवाचे दर्शन घेता येणार आहे. याच कारणामुळे राज्यात ठिकठिकाणी भाजने आनंदोत्सव साजरा केला आहे. औरंगाबादेतदेखील भाजप नेते तसेच कार्यकर्त्यांनी गजानन महाराज मंदिरात जमून आरती केली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी भाजप नेत्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, आमदार अतुल सावे तसेच भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी गजानन महाराज यांची सामूहिक आरती केली.
शहरातील इतर मंदिरेदेखील खुली, नियमांचे पालन
औरंगाबाद शहरातील इतर मंदिरंदेखील आजपासून उघडण्यात आली आहेत. यामध्ये कर्णपुरा देवाचे मंदिर, कडेठाणचे महालक्ष्मी मंदिर, सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिर, विविध मशिदी तसेच इतर धार्मिक धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
कर्णपुरा देवी मंदिरातील व्यवस्था
शहरातील सर्वात प्राचीन मंदिर म्हणून कर्णपुरा देवीच्या मंदिराची ओळख आहे. हे मंदिर आजपासून उघडण्यात आले आहे. त्यासाठी कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दर्शनाच्या रांगेत भाविकांना एक-एक मीटरच्या अंतरावर उभे रहावे लागणार आहे. तसेच सकाळी 5.30 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत भक्तांना दर्शन घेता येईल. मास्कशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
रेणुका माता मंदिरात काय व्यवस्था ?
जळगाव रोडवरील रेणुका माता मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. येथे सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत. भक्तांना सुरक्षित अंतर ठेवून रांगेत उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर तसेच मास्क लावूनच भक्तांना मंदिरात सोडले जाईल, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक दीपक पाठक यांनी काल दिली होती.
इतर बातम्या :
PHOTO: औरंगाबादेत पुन्हा दाणादाण, मोठ-मोठी झाडं पडली, विजेचे खांब वाकले, कोर्ट परिसरात मोठे नुकसान
Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘स्टार प्रवाह’ची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ठरली महाराष्ट्राची नंबर वन मालिका, गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंतीhttps://t.co/emnVrch4oS#SukhMhnjeNakkiKayAsta #MarathiSerial
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2021
(bjp leader bhagwat karad atul save celebrate temple opening in aurangabad worship gajanan maharaj temple today)