“नामांतरावरून जलील राजकीय पोळी भाजत आहेत”; भाजप खासदाराची एमआयएमवर सडकून टीका…
औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असं नामांतर केल्यानंतरही राजकारण काही थांबायचे नाव घेत नाही. त्यातच जलील यांनी मरायचं तर औरंगाबादमध्ये अशी वक्तव्य केली आहेत. त्यावर आता भागवत कराड यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे नामांतर झाल्यानंतर औरंगाबादमधील राजकारण ढवळून निघाले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामाकरण करण्यात आल्यानंतर त्या नावाला विरोध दर्शवत जलील यांनी औरंगाबादमध्ये बेमुदत आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या आंदोलनावरूनही जोरदार हल्लाबोल केला गेला आहे.
त्यावरूनच आता राजकारण तापले असल्याने भाजपचे खासदार भागवत कराड खासदार इम्तियाज जलील यांचे नामांतराविरोधी उपोषण चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून औरंगाबाद शहराचे नामांतर केल्यानंतर त्याच्यावरून राजकारण करण्याचे कारस्थान केले जात आहे. मात्र अशा पद्धतीने करणे चुकीचे असल्याचेही मतही भागवत कराड यांनी यावेळी व्यक्त केले.
औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामाकरण केल्यानंतर त्यावरून कोणत्याही पक्षाने आक्षेप अथवा त्याबद्दल विरोध नोंदवला नाही.
मात्र नामांतर झाल्यापासून खासदार जलील हे फक्त नामांतराच्या मुद्यावरून राजकारण करत असल्याची टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे.
तर आमदार संजय शिरसाट यांनी औरंगजेबची कबर हैद्राराबादला हलवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यावरूनही आता भागवत कराड यांनी त्यांचे अभिनंदन करत औरंगजेब कबरीबद्दल केलेल्या वक्तव्याचं मी समर्थन करत असल्याचे कराड यांनी सांगितले.
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. मात्र त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराविरोधी उपोषण सुरू केले.
मात्र जलील यांचे हे उपोषण चुकीचं असून खासदार जलील हे नामांतरावरून केवळ आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
औरंगाबाद शहराचे नाव आता बदललेले आहे. त्यामुळे सगळीकडे छत्रपती संभाजीनगर या नावाचा वापर सुरू झाला आहे.
तरीही इम्तियाज जलील यांची इच्छा असेल की,मरतानाही औरंगाबादमध्येच मरावं तर त्यांनी बिहारमधील औरंगाबाद येथे जाऊन मरावं लागेल असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
आमदार संजय शिरसाठ आणि प्रदीप जैस्वाल यांनी औरंगजेबची कबर हैदराबादला हलवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्याविषयी बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करत त्यांनी त्या गोष्टीचे समर्थन केले आहे.