औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा, बड्या मंत्र्याचे स्पष्ट संकेत, शिवसेनेची कोंडी ?
गामी औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेशी युती करणार नाही, असे स्पष्ट संकेत भाजपने दिले आहेत. भाजप नेते तसेच केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी महापालिका निवडणुकीत आम्हाला युती करायची नाही असे स्पषटपणे सांगितले आहे.
औरंगाबाद : राज्यात शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. ही चर्चा सुरु असतानाच औरंगाबादेतील राजकारणदेखील तापलं आहे. राज्यात शिवसेना, भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी आगामी औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेशी युती करणार नाही, असे स्पष्ट संकेत भाजपने दिले आहेत. भाजप नेते तसेच केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी महापालिका निवडणुकीत आम्हाला युती करायची नाही असे स्पषटपणे सांगितले आहे. (bjp will not ally with shiv sena in aurangabad municipal corporation election said bhagwat karad)
भाजप सर्व जागा स्वबळावर लढणार
भागवत कराड औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होतो. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबाद येथील महानगपालिकेच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. आम्हाला औरंगाबाद महापालिकेमध्ये युती करायची नाही. उलट औरंगाबाद माहपालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 115 जागा भाजप स्वबळावर लढणार आहे, असे कराड म्हणाले. तसेच या शहरात आम्ही भाजपचा महापौर बसवणार, असे म्हणत शिवसेनेसोबत युती होण्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.
औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची पंचाईत होणार ?
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकीय घटनांनी तर चांगलाच वेग घेतला आहे. राज्य पातळीवरील भाजप तसेच शिवसेनेच्या काही नेत्यांनी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्ये केले आहेत. या वक्तव्यांमुळेच महानगपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीची शक्यता वर्तविली जात आहे. पण भागवत कराड यांनी युतीची शक्यता नाकारल्यामुळे औरंगाबादमध्ये भाजपला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा बाळगणाऱ्या शिवसेना नेत्यांची पंचाईत झाली आहे.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला झटका
दरम्यान, औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक धक्का बसला. MIM च्या माजी नगरसेविकेने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी 19 स्पटेंबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला. साजेदा सईद फारुकी आणि सईद फारुकी अशी राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांची नावे आहेत. अलिकडेच एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता. महापालिका निवडणुकांच्या आधीच एमआयएममध्ये गळती सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये एमआयएमला झटका बसण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :
आहे मौका तर मारा चौका… सोने-चांदीचे भाव कोसळले, काय आहेत औरंगाबादचे आजचे भाव?
औरंगाबादच्या कार्तिकची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड, दिल्लीतील विनू मांकड ट्रॉफीत कौशल्य आजमावणार
Video | सत्ताधाऱ्यांचे घोटाळे उघडकीस आणल्याने Kirit Somaiya यांच्यावर सरकारकडून दबावतंत्र : Mihir Kotecha@mihirkotecha #MihirKotecha #KiritSomaiya #MahaVikasAghadi #Maharashtra
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/5nx95Ony7y
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2021
(bjp will not ally with shiv sena in aurangabad municipal corporation election said bhagwat karad)