निवडणूक लढवायला बायको पाहिजे बॅनरचा वाद चिघळला, भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी (Bjp) गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाईफेक करीत बॅनर फाडला.

निवडणूक लढवायला बायको पाहिजे बॅनरचा वाद चिघळला, भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक
औरंगाबादेत अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत.
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 4:36 PM

औरंगाबाद : निवडणुकीसाठी उमेदवार बायको (Wife Banner) पाहिजे अशा आशयाचे बॅनर (Ramesh Patil Banner) रमेश पाटील या विवाहित तरुणाने शहरातील विविध चौकात लावले होते. या बॅनरवरून सकाळपासून राज्यभर चर्चेला उधाण आले आहे. दुपारी संतप्त भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी (Bjp) गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाईफेक करीत बॅनर फाडला. बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील या तरुणांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे हा बॅनरचा वाद वाढताना दिसून येत आहे. त्याला निवडणूक लढवायची इच्छा होती. मात्र लॉकडाऊनमध्ये तिसरे आपत्य झाल्यामुळे तो निवडणुकीसाठी उभा राहू शकत नाहीये. याच तरुणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर लावले आहे. तरुणाच्या या बॅनरची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

या बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असवी हेसुद्धा लिहले आहे. पाटील यांचा प्लॉटिंग चा व्यवसाय आहे. रमेश पाटील यांनी लिहलेले बॅनर अतिशय मजेदार आहे. त्यांनी बॅनरवर पत्नीचे वय तसे च ती कशी असावी याविषयी सविस्तर लिहले आहे. ‘मला तीन मुले असल्यामुळे मी निवडणूक लढवू शकत नाहीये. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मला उमेदवार बायको पाहिजे. जातीची अट नाहीये. मुलीचे वय 25 ते 40 वर्षादरम्यान असावे. विधवा तसेच घटस्फोटीत मुलगीदेखील चालेल. लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुलीला दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे,’ असे पाटील यांनी त्यांच्या बॅनरमध्ये लिहले आहे. तशा अटी त्यांनी सांगितल्या आहेत.

बॅनरविरोधात भाजप आक्रमक

या बॅनवरून आता भाजप आक्रमक झाले आहे, भाजपच्या महिलांनी हे बॅनर शाईफेक करत फाडलेच, मात्र पाटील यांच्यावर आता त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे बॅनर लावण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. यामुळे महिलांचा अपमान होत आहे, असा आरोप भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. आता राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने अनेकांना इच्छा असूनही निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळेच हा प्रकार समोर आला आहे.

Aurangabad | औरंगाबादच्या पाटलाची महाराष्ट्रात चर्चा, निवडणूक लढवण्याची म्हणतो ‘उमेदवार बायको पाहिजे,’ शहरभर बॅनर

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही गांधी विचाराने चालेल, कोल्हेंबाबत पटोलेंची भूमिका काय?

नॉटी, नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले…अमृता फडणवीसांची 100 मार्कांची प्रश्नपत्रिका

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.