तर मुंबई-औरंगाबाद अंतर दीड तासाचं, मुंबई-नागपूर अंतर तीन तासाचं होईल; रावसाहेब दानवेंनी सांगितला मेगा प्लान!
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे औरंगाबादमध्ये आले होते. औरंगाबादमध्ये येताच रावसाहेब दानवेंनी रेल्वेचा मेगा प्लान सांगितला. (bullet train can run between mumbai-aurangabad and Mumbai-Nagpur, says raosaheb danve)
औरंगाबाद: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे औरंगाबादमध्ये आले होते. औरंगाबादमध्ये येताच रावसाहेब दानवेंनी रेल्वेचा मेगा प्लान सांगितला. बुलेट ट्रेन मार्गी लागली तर मुंबई-औरंगाबादचं अंतर दीड तासावर आणि मुंबई-नागपूर अंतर तीन तासांवर येईल, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. (bullet train can run between mumbai-aurangabad and Mumbai-Nagpur, says raosaheb danve)
औरंगाबाद रेल्वे स्थानकात उतरताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांकडून हारतुरे स्वीकारल्यानंतर दानवे यांनी मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी रेल्वेचा मेगा प्लान सांगितला. मी आज पहिल्यांदा रेल्वे मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यात आलो. माझ्या कार्यकर्त्यांना आनंद झाला. त्यांनी माझा सत्कार केला. मी कार्यकर्त्यांच्या बळावर इथपर्यंत पोचलो. मलाही आनंद वाटला. मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता. जिथे इंग्रज होते तिथे रेल्वेचं जाळ तयार झालं. मराठवाड्यातल्या रेल्वेचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर-मुंबई हा सर्वाधिक वापरला जाऊ शकणार रेल्वे मार्ग बनू शकतो. तो बुलेट ट्रेन मार्ग जर तयार झाला तर मुंबईहून औरंगाबादला दीड तासात आणि नागपूरला 3 तासात आपण पोचू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम ते होऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं. तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना एक सादरीकरण तयार करायला सांगितलं आहे. मी गेल्यावर हे सादरीकरण पाहून पुढील कार्यवाही केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसने 50 टक्क्यांची मर्यादा का उठवली नाही?
आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं. या सरकारने बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झालं. पण आत राज्याला अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा उपयोग करून राज्यांनी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आता ते म्हणतायत 50 टक्केची कॅप उठावा. पण आजपर्यंत काँग्रेस सरकार होते त्यांनी आजपर्यंत ही कॅप का उठवली नाही?, असा सवाल करतानाच भाजपमध्ये सर्व समाजचे लोक आहेत. त्यांच्या पक्षात आहेत का वेगवेगळ्या समाजाचे लोक. आम्ही सतत ओबीसी समाजाला न्याय दिला. पण आता हे ओबीसी समाजाला भाजपपासून फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य होणार नाही, असं ते म्हणाले.
आघाडीकडून फसवणूक
या सरकारला अपयश आलं की लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सरकार राज्यपाल आणि केंद्र सरकारवर टीका करत असतं. राज्यातील जातीय स्थिती या लोकांनी बिघडवली आहे. नारायण राणे समिती नेमून आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. समितीला आरक्षणाचा अधिकार असतो का? आघाडी सरकार फसवणूक करत आहेत. मराठा समाज या सरकारला माफ करणार नाही, असं सांगतानाच हे तीन पक्षाचं अमर, अकबर, अँथोनीचं सरकार आहे, इथे प्रत्येक जण आपल्या खात्याचा मालक आहे. या सरकार बद्दल प्रचंड नाराजी लोकांमध्ये आहे, असंही त्यांनी सांगितलं. (bullet train can run between mumbai-aurangabad and Mumbai-Nagpur, says raosaheb danve)
आज सकाळी औरंगाबाद ( संभाजीनगर ) रेल्वे स्थानकावर पोहोचलो. आपण सर्वांनी केलेल्या अभुतपूर्व स्वागताने भारावून गेलो… धन्यवाद.! pic.twitter.com/yMzFkfQFXs
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) August 17, 2021
संबंधित बातम्या:
अमित शहा, जेपी नड्डांना भेटल्यानंतरही पंकजा मुंडे नाराज?; रावसाहेब दानवेंनी केलं मोठं विधान!
VIDEO : उद्धवजी, माझ्या-आई वडिलांना वाचवा, पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्याची आर्त हाक!
‘ते’ ताट राज्य सरकारच हिसकावून घेतंय; चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांवर पलटवार
(bullet train can run between mumbai-aurangabad and Mumbai-Nagpur, says raosaheb danve)