भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरण, शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना नेते तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यास मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दखल करण्यात आलाय.

भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरण, शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 5:14 PM

औरंगाबाद : शिवसेना नेते तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यास मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दखल करण्यात आलाय. लसीकरणावरून भाजप पदाधिकारी तथा माजी नगरसेविकेच्या पतीला मारहाण केल्याचा हा आरोप आहे. जंजाळ यांच्यासह इतर 8 ते 10 कार्यकर्त्यांविरोधात जवारह पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (case has been registered against Shivsena leader Rajendra Janjal in Aurangabad)

जवाहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे काही कार्यकर्ते तसेच राजेंद्र जंजाळ यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला. या आरोपानंतर जंजाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता जवाहर पोलीस ठाण्यात जंजाळ यांच्यासह इतर आठ ते दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर औरंगाबादेत भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.

नेमका प्रकार काय आहे ?

भाजप कार्यकर्ते गोविंद केंद्रे यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. शिवसेनेचे नेते राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात केंद्रे यांना घेऊन जात मारहाण करण्यात आली. त्यानंतर गोविंद केंद्रे यांची प्रकृती नाजूक झाली होती. त्यांना सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली होती. या आरोपानंतर शिवसेनेने संदीपान भुमरे यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक केले होते. तसेच केंद्रे यांना कोणतीही मारहाण केली गेलेली नाही, असा दावा शिवसेनेने केला होता.

शिवसेना काय भूमिका घेणार

दरम्यान, जंजाळ यांच्यासह इतर आठ ते दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Video : औरंगाबादेत शिवसेनेच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्याला खरंच मारहाण? शिवसेनेनं थेट सीसीटीव्ही फुटेज दिलं!

(case has been registered against Shivsena leader Rajendra Janjal in Aurangabad)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.