Video | औरंगाबाद पंचायत समितीत तुफान राडा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भाजप सभापतीला मारहाण
औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला.
औरंगाबाद : औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला. या राड्याने नंतर टोकाच्या भांडणाचे स्वरुप धारण केले. यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या सभापतीला थेट मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या व्हायरल होत आहे. काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील या राड्याचे नेमके करण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (clash between bjp and congress activists in aurangabad panchayat samiti video went viral on social media)
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भाजपच्या सभापतीला थेट मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेच्या पंचायत समितीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते तसेच काही पदाधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला. वैचारिक मतभेद असलेल्या भाजप आणि काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नंतर मारहाण झाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सभापतीला थेट मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड
मुंबईची लोकल कधी सुरू होणार?; वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार, पण फायदा कुणाला?; वाचा सविस्तर
(clash between bjp and congress activists in aurangabad panchayat samiti video went viral on social media)
बाळाला वाचवताना गंभीर दुखापत, 14 वर्षांच्या साक्षीला नवा पाय मिळणार, उपचाराची संपूर्ण जबाबदारी केईएम घेणार https://t.co/BXVX63okQY #SakshiDabhekar | #KEMHospital | #Raigad | #Landslide | #Poladpur | @KishoriPednekar | @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2021