आता औरंगाबादला एक दिवसाआड पाणी देणार, नव्या पाणी योजनेची लवकरच अंमलबजावणी; एकनाथ शिंदे यांची घोषणा
एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
औरंगाबाद : आता औरंगाबादला (Aurngabad) एक दिवसाआड पाणी येणार. नव्या पाणी योजनेची लवकरच अंमलबजावणी होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.त्यांनी आज मराठवाड्याचा आढावा घेतला. दुष्काळाची माहिती घेतली. घराचं नुकसान, पंचनामे, शेतीचं नुकसान आदींची माहिती घेतली. हे युतीचं सरकार आहे. ते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱयांना मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय कॅबिनेटमध्ये घेऊ. या जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न होता. जुनी योजना पाण्याची. ७०० मीमी जलवाहिनी बदलण्याची मागमी होती. पाईप बदलले तर २०० कोटी लागेल. त्यामुळे १७ ते १८ लाख लोकांना फायदा होईल. आता सात दिवसाने पाणी मिळतं. नंतर एक दिवस आड मिळेल. ७० एमएलडी पाणी उपलब्ध होईल, असं शिंदे म्हणालेत.
“सव्वा तीनशे कोटीचं नुकसान झालं आहे. शेतीचं. एनडीआरएफच्या नियमाने कमी मदत मिळते. पण आम्ही अधिक मदत करणार आहोत. फक्त मराठवाड्यासाठी वेगळी घोषणा करता येणार नाही. संपूर्ण राज्याासाठी घोषणा करणार. मी जे बोललो ते काम होणारच. मागे काय झालं त्यावर मी बोलणार नाही. पण मी जे बोलतो ते करून दाखवतोच. होणारच काम मी सांगतो. त्यात हयगय होणार नाही”, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
“मराठवाड्यातील आत्महत्या कमी करण्यासाठी निर्णय घेतला आहे. आत्महत्या होऊ नये म्हणून प्रिव्हेंटीव्ह अॅक्शन घेतली पाहिजे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना प्लान तयार करायला सांगितलं आहे. बँकांनाही शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि बँकाचे अधिकारी यांच्या बैठका घेणार आहेत”, असंही ते म्हणालेत.
विकासकामांबाबत म्हणाले…
वेरूळ कृष्णेश्वराच्या विकासाची मागणी आली होती. नांदेड शहराच्या रस्त्याचे प्रस्ताव आला. परभणीतील समांतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. नांदेड-जालना एक समृद्धी हायवे करणार आहोत. नांदेडातील भूमिगत गटार योजना मंजूर करू. लातूरचं जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. त्यासाठी मोफत जमीन देण्याच्या अडचणी दूर करू. घाटी रुग्णालयाचं खासगीकरण करणार नाही याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.