Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, औरंगाबादेतली सभा रेकॉर्डब्रेक होणार, शिवसेना नेत्यांचा दावा
औरंगाबाद शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी हजारो झेंडे मागवण्यात आले आहेत. या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजप आणि राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
औरंगाबाद : उद्या औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची विराट सभा पार पडणार आहे. यासभेसाठी शिवसेनेकडून (Shivsena) जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी आजपासूनच काही शिवसेना नेते औरंगाबादेत (Aurangabad Speech) ठाण मांडून बसले आहेत. नेत्यांकडून आता या सभेच्या तयारीचा आढाव घेण्यात येत आहे. तसे मुख्यमंत्र्यांची ही सभा रेकॉर्डब्रेक होईल असा दावाही शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा स्टेजच्या एका बाजूला ठेवण्यात आला आहे. तसेच सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असल्याने संभाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. तसेच औरंगाबाद शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी हजारो झेंडे मागवण्यात आले आहेत. या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजप आणि राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सभेचा नवा टिझर
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादेतल्या सभेचा दुसरा टिझर… pic.twitter.com/R8aaG26RX9
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2022
हजारो झेडें फडकले
ही तयारी सध्या स्थानिक शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याकडून सुरू आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या कार्यालयात हे झेंडे ठेवण्यात आले आहेत. तर हे झेडें आज सायंकाळी संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये लावले जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आलीय. यासाठी अनेक कामगार काम करताना पाहायला मिळत आहेत. हे झेंडे कार्यालयात दाखल झाल्यानंतर आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली आहे.
सभा ही रेकॉर्डब्रेक होणार
उध्दव ठाकरे यांची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे, आमचे सर्व मोठे नेते खूप प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही सभा गाजणार आहे, या सभेसाठी युवा सेनेने खूप मोठे प्रयत्न केले आहेत, ही सभा यशस्वी होईल, तसेच उद्या मुख्यमंत्री विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील, अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेनेचे युवानेते वरून सरदेसाई यांनी दिली आहे.
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
याबातत शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगरची सभा ही विराट होणार आहे, औरंगाबादचं होणार की नाही या विषयावर उद्धव ठाकरे बोलतील. औरंगाबादच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सनदी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे, त्यामुळे पाणी तर आम्ही देणारच आहोत. तर संभाजीनगर नाव होण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. केंद्राने लवकरात लवकर तो मंजूर करावा, असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत. त्यामुळे या सभेची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात गाजत आहे.