औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 658 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात एकट्या औरंगाबाद शहरात 519 रुग्णांची भर पडलेली दिसून आली तर ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा 139 एवढा नोंदवला गेला. दिवसभरात औरंगाबादेत जवळफास दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरीही या आजाराची गंभीर लक्षण दिसत नसल्याने रुग्ण घरच्या घरीच खासगी दवाखान्यांमध्ये दाखवून उपचार घेत आहेत. जवळपास 90 टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तरीही पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्यांच्या संपर्कातील नागरिकांची स्वतःहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपाकडून करण्यात येत आहे. यानंतरही अनेक जण तपासणीसाठी येतच नसून खासगी डॉक्टरांमार्फतच उपचार घेत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
औरंगाबाद- 65
फुलंब्री- 5
गंगापूर- 43
कन्नड- 4
खुलताबाद- 2
सिल्लोड- 2
वैजापूर-8
पैठण- 10
आज 658 रुग्णांची भर
आजपर्यंत एकूण रुग्ण एक लक्ष 54 हजार 307
आज 150 जणांना सुटी
आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे
आजपर्यंत एकूण 3 हजार 662 मृत्यू
आज 3614 रुग्णांवर उपचार सुरू pic.twitter.com/SGt9YbtPfR— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) January 16, 2022
संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार करता रविवारी 2 हजार 523 कोरोना बाधित आढळले. तर रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीतदेखील औरंगाबादच पुढे आहे. येथे 3 हजार 614 रुग्ण उपचार घेत आहेत.
इतर जिल्ह्यांमध्ये रविवारी आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे-
नांदेड- 643
लातूर- 543
उस्मानाबाद- 194
जालना- 185
बीड- 125
परभणी- 101
हिंगोली- 74
इतर बातम्या-