VIDEO: फडणवीसांनी तपास यंत्रणेचे ओएसडी बनावं अन् सोमय्यांना प्रवक्ता नेमावं; मलिकांचा हल्लाबोल सुरूच

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी आता स्वत: तपास यंत्रणांचा ओएसडी बनावं आणि किरीट सोमय्या यांना या यंत्रणांचा प्रवक्ता बनवावं.

VIDEO: फडणवीसांनी तपास यंत्रणेचे ओएसडी बनावं अन् सोमय्यांना प्रवक्ता नेमावं; मलिकांचा हल्लाबोल सुरूच
nawab malik
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 12:39 PM

बीड: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी आता स्वत: तपास यंत्रणांचा ओएसडी बनावं आणि किरीट सोमय्या यांना या यंत्रणांचा प्रवक्ता बनवावं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

नवाब मलिक बीडमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरच हल्ला चढवला. फडणवीस तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. मी काही कुणालाही घाबरणार नाही. भाजप ही महाराष्ट्रातील चोरों का बाजार आहे. तर किरीट सोमय्या या बाजारातील बाराती आहेत, असा घणाघाती हल्ला मलिक यांनी चढवला.

पाहुण्यांची वाट पाहतोय

दरम्यान, आपल्या घरावर ईडीची धाड पडणार असल्याचं मी ऐकलं. मी पाहुणे येण्याची वाट पाहत आहे. त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटं आणून ठेवली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

आधी तुम्ही राजीनामे द्या

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे. कोणी कितीही स्वप्न पाहिली तरी आमचं सरकार पाच वर्ष चालेल, असं सांगतानाच आम्हाला राजीनामा द्यायला सांगण्यापेक्षा हिंमत असेल तर अमित शहांनीच राजीनामा दिला पाहिजे. लोकसभेची निवडणूक आधी झाली. त्यामुळे पहले आप, बाद में हम, असा पलटवारही त्यांनी केला.

ट्रम्प यांच्यामुळेच कोरोना आला

यावेळी कोरोनाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. मोदी सरकारने नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम घेतला आणि देशात लॉकडाऊन लागला. ट्रम्पमुळेच देशात आणि महाराष्ट्रात कोरोना आला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परदेशातील विमान सेवा बंद करण्याची मागणी केली होती. पण मोदींनी ते ऐकलं नाही, असं ते म्हणाले.

जमिनी हडपणारे तुरुंगाची हवा खाणार

महाराष्ट्रता फर्जीवाडा सुरू आहे. जमिनी हडप करणाऱ्यांना तुरुंगात टाकणार आहोत. दर्गा आणि मंदिराची जमीन हडप करणारे लवकरच तुरुंगाची हवा खातील, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

Tukaram Supe : तुकाराम सुपेंकडं घबाड सापडलं, मेव्हण्याच्या घरातून 2 कोटींसह सोनं पुणे पोलिसांकडून जप्त

VIDEO: आमदार, मंत्री झाला तरी पालिकेत जीव कसा घुटमळतोय, आता जीव मोकळा करा; महापौर किशोरी पेडणेकरांचा शेलारांवर हल्लाबोल

भाजप चोरांचा बाजार, सोमय्या बॅन्ड बाराती; तपास यंत्रणेवरून मलिकांचा टोला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.