Dr. BAMU विद्यापीठाच्या पीआरओचा प्रताप, विद्यार्थिनीशी अश्लिल चॅटिंगचा आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल

| Updated on: Sep 09, 2021 | 4:37 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संजय शिंदे हे जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरी करतात. तक्रारदार विद्यार्थिनीने सांगितल्याप्रमाणे शिंदे यांनी पीडितेशी अश्लिल चॅटिंग केली. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थिनीने थेट बेगमपुरा पोलीस ठाणे गाठले. तसेच येथे विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली.

Dr. BAMU विद्यापीठाच्या पीआरओचा प्रताप, विद्यार्थिनीशी अश्लिल चॅटिंगचा आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल
Follow us on

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील जनसंपर्क अधिकाऱ्यावर एका विद्यार्थिनीने विनयभंगाचा आरोप केलाय. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरुन जनसंपर्क अधिकाऱ्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University public relations officer Sanjay Shinde accused for molestation of girl student)

विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संजय शिंदे हे जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरी करतात. दाखल तक्रारीनुसार शिंदे यांनी पीडितेशी अश्लिल चॅटिंग केली. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थिनीने थेट बेगमपुरा पोलीस ठाणे गाठले. तसेच येथे विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यावर कलम 354 ड आणि 509 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पीडित विद्यार्थिनीला न्याय द्यावा 

या घटनेनंतर विद्यापीठ संकुलात एकच खळबळ उडाली असून विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीला न्याय देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत.

विद्यापीठात अभ्यासक्रमांना कात्री

दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने काही अभ्यासक्रम कायमस्वरुपी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. मागील 5 शैक्षणिक वर्षांत अभ्यासक्रमाच्या क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या कमी दिसून आली. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांतील विषयांसाठीच्या प्राध्यापकांची नेमणूक आणि इतर सोयीसुविधांच्या खर्चाचा बोजा विद्यापीठावर पडत असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला.

कोणते कोर्सेस बंद  

विद्यार्थ्यांनी कमी प्रमाणात पसंती दर्शवल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ११ कोर्सेस बंद करण्यात आले आहेत. या कोर्सेसमध्ये एमएस्सी (मॅथेमॅटिक्स), एमटेक इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डीबीएम), सर्टिफिकेट कोर्स ऑफ प्रोफीसेन्सी एन रशियन, बीए इंटरनॅशनल (जर्नालिझम अँड आर्ट अँड सायन्स युनिस्को कोर्स), बीएड, एमएड इंटिग्रेटेड कोर्स, डिप्लोमा इन टीव्ही प्रोडक्शन अँड बेसिक फिल्म मेकिंग, बॅचलर ऑफ डान्स, बीए (म्युझिक), बॅचलर ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड ग्राफिक्स आर्ट (बीपीटी अँड जीए), एमएससी नॅनो टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

इतर बातम्या :

अबब!!! ढगफुटीपेक्षाही भयंकर कालचा औरंगाबादचा पाऊस, वाचा पावसाच्या सरी किती तुफान वेगानं बरसल्या

औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पिकं पाण्याखाली, मदतीसाठी प्रयत्न करणार, मंत्री भुमरे यांचे आश्वासन

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

(Dr Babasaheb Ambedkar Marathwada University public relations officer Sanjay Shinde accused for molestation of girl student)