औरंगाबाद : वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे (sudden changes in the climate) औरंगाबादेतील लहान मुलांना आजारांनी ग्रासलं आहे. ताप (Fever), सर्दी (Cold), खोकला (Cough), यांसारख्या आजारांनी लहान मुलं बेजार झाली आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी लहान मुलांची तुफान गर्दी झाली आहे. नेहमीच्या तुलनेत लहान मुलांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे लहान मुलांसोबतच मोठ्यांचीही दवाखान्यांमध्येही गर्दी पाहायला मिळत आहे.
घाटी रुग्णालयात उपचारासाठी लहान मुलांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळतीय. एकाच बेडवर दोन दोन मुलांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळेच रुग्णालयात रुग्णांची अक्षरशः तोबा गर्दी पाहायला मिळतीय. तशाच गर्दीचा घाटी रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे.
एका बेडवर दोन दोन मुलं तर बेडच्या खाली नातेवाईकांची गर्दी झाली आहे. लहान मुलं तर आजारी आहेतच पण त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक देखील रुग्णालयात आहेत.रुग्णालयात गर्दी असल्याने त्यांचीही मोठी गैरसोय होतीय. वातावरण बदलामुळे औरंगाबादेतली जवळपास 80 टक्के मुलं आजारी पडली आहे.
सध्या औरंगाबादेत व्हायरल फिव्हर, इन्फ्लूएन्झा, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजारांचं प्रमाण जास्त आहे. व्हायरल फिव्हरमध्ये अनेक रुग्णांना औषध-गोळ्या घेऊनही ताप उतरत नसल्याचं दिसतंय. इन्फ्लूएन्झामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणं दिसत आहेत. अनेकांचा ताप 5-6 दिवस जात नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये दुसराच काही आजार झाल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर तपासण्या आणि चाचण्या केल्यास त्याचाही आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत आहे.
वातावरणातल्या बदलांमुळे औरंगाबादेत आजारांचं प्रमाण वाढलं आहे. पण नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्यात कोरोना आणि व्हायरल फिव्हरची लक्षणं सारखीच असल्याने नागरिक आणि लहान मुलांचे पालक घाबरून जात आहेत. रुग्णांचा ताप जात नसल्याने कोरोना आणि इतर काही लक्षण दिसतात का यांच्या चाचणी आणि तपासण्या करण्यात वाढ झाली आहे.
डॉक्टरांकडे गेल्यानंतर विविध प्रकारच्या तपासण्या करण्यास सांगितलं जात आहे. यात रक्त, लघवी, कोरोनासह इतर चाचण्यांचा समावेश आहे. ज्यांना किरकोळ लक्षणं आहेत त्यांना गोळ्या-औषधांसोबत गरज वाटल्यास इंजेक्शनही दिलं जात आहे. व्हायरल फिव्हर, फ्लू, डायरिया, न्यूमोनिया ब्राँकायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
हे ही वाचा :
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट म्हणून घोषित
औरंगाबाद शहराची तहान भागली, जायकवाडी धरणाची पाणी पातळी 60 टक्क्यांच्या पुढे, हर्सूल तलावही तुडुंब