राज्यावर वीज कपातीचे संकट; दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा;नितीन राऊत यांच्याकडून स्पष्ट
राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
औरंगाबाद: राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले आहे. तर तीन दिवस पुरेल इतकं पाणी शिल्लक असल्याने वीज पुरवठ्याची समस्या राज्यावर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्राने कोळसा (Coal) उपलब्ध करून नाही दिला तर मोठं वीजसंकट (Loadsheding) येणार असल्याचेही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली माहिती दिली आहे.
सध्या राज्यात वीज कपातीचे संकट निर्माण होत आहे, एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून आज स्प,स्पष्ट करण्यात आले. राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने राज्यावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोळसा संकट राज्यावर ओढावला असतानाच पाणी संकटही येणार असल्याचे नितीन राऊत यांनी राज्यावर वीज संकट येणार असल्याचे स्पष्ट केले.
केंद्राने कोळसा द्यावा
वीज निर्मिती करत असताना कोळसा आणि पाण्याचे संकट तीव्र झाले तर वीज पुरवठ्याची समस्या राज्यावर येणार आहे. केंद्र सरकारकडून कोळसा उपलब्ध करुन दिला गेला नाही तर राज्यावर मोठं वीज संकट येणार आहे. त्यामुळे केंद्राकडून तात्काळ कोळस उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी नितीन राऊत यांनी केंद्राकडे गेली आहे.
गुजरातकडून वीज घेणार:प्राजक्त तनपूरे
राज्यावर वीज संकट निर्माण झाले असल्याने महाराष्ट्रावरील भारनियमन कमी करण्यासाठी गुजरातकडून 760 मेगावॅट वीज घेण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी दिली. मागच्या वर्षीच्या तुलनेत विजेची मागणी 10 टक्क्यानी वाढ झाली आहे. तर देशात मोठ्या प्रमाणात कोळशाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणकडून राज्यावर वीज संकट येऊ नये यासाठी काळजी घेत आहे. तसेच आम्ही तातडीने मंत्रीमंडळाची बैठक घेऊन गुजरातमधील एका कंपनीकडून 760 मेगावँट वीज घ्यायला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच राज्यात कशाप्रकारे भारनियमन कमी करता यावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही गोंदियाचे नवनियुक्त पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी प्रसारमाध्यंमांशी बोलत होते.
संबंधित बातम्या
Video : “मी पुन्हा येईन’ या नादात माझंच फोन टॅपिंग”, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
Guniratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच, पोलीस कोठडीतील मुक्काम दोन दिवसाने वाढला