औरंगाबादः पिपंरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी उमेदवारांना उत्तरे सांगितल्याप्रकरणी औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. यासोबतच आणखी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींच्या चौकशीतून अजूनच धक्कादायक माहिती उघड होत आहे. विशेष म्हणजे या हायटेक कॉपीची मुळं ग्रामीण भागापर्यंत रुतलेली असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी राहुलला अटक केल्यानंतर या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे. 2012 साली शहर पोलीस दलात भरती झालेला राहुल गायकवाड हा सासऱ्यासोबत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालवत होता. तसेच त्याचे 4 नातेवाईकही पोलीस दलात आहेत. हे सर्वजण ग्रामीण भागातील तरुणांना कॉपीच्या जाळ्यात खेचत असल्याचे समोर येत आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या 720 पदांसाठी राज्यात 19 नोव्हेंबरला भरती प्रक्रिया पार पडली. यावेळी हिंजवडी ठाण्याच्या हद्दीतील केंद्रात नितीन मिसाळ याच्या मास्कमध्ये इलेक्ट्रिक डिव्हाइस जप्त करण्यात आले. पोलीस त्याला पकडण्याच्या तयारीत असताना त्याने पळ काढला. अधिक तपास केला असता, औरंगाबादमधील रामेश्वर शिंदे आणि गणेश वैद्य याने उत्तरे सांगण्यास मदत केल्याचे समोर आले. तसेच वैद्य याला उत्तरे सांगणाऱ्या राहुल गायकवाडलाही सिटी चौक पोलीस स्टेशनमधून अटक करण्यात आले.
सिटी चौक पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल राहूल याच्या नातेवाईकांची चौकशी पोलिसांनी केली. यात उघड झालेली माहिती म्हणजे, राहुल हा वैजापूर तालुक्यातील निमगावचा. त्याच्या गावापासून पाच ते सहा किमी अंतरावर कोरडगावात त्याची सासुरवाडी आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, त्याच्या सासऱ्याची आधी शिऊर बंगला येथे भाड्याच्या जागेत छोट्याशा शेडमध्ये अकॅडमी होती. मात्र काही दिवसांपूर्वीच लोणी शिवारात स्वतःच्या जागेत आलिशान अकॅडमी उभी राहिली. गायकवाडच्या सासऱ्याचे राहुलसह दोन जाईव, मुलगा आणि सून पोलीस दलात आहेत. सासरा शेतकरी असल्याचे सांगितले जाते. मग आता ही सुसज्ज अकॅडमी नेमकी कुणाची आहे, याचा तपास पोलीस घेत आहेत.
इतर बातम्या-