औरंगाबादः सध्याच्या वाढीव लोकसंख्येनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. नवीन धोरणानुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेत (ZP election) 8 गट, 16 गणांची वाढ निश्चित केली आहे. त्यामुळे आता 62 ऐवजी 70 गट असतील. तसेच प्रत्येक गटाची लोकसंख्या 35 हजार 703 एवढी असेल.
औरंगाबाद महापालिकेची मुदत संपून जवळपास वर्ष होत आहे. तसेच जिल्हा परिषदांचीही मुदत तीन महिन्यात संपत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या निवडणुकांची तयारी सुरु आहे. मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. त्यामुळे जनगणना झाली नाही, त्यामुळे प्रभाग, गट, गण आदींची लोकसंख्या , मतदार किती असतील असा प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने वाढील लोकसंख्येचा अंदाज घेऊन निवडणूका घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतील गटांचीही संख्या वाढवणार.
याआधीच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 62 झाली होतकी. तर गणांची संख्या 124 एवढी होती. आता यामध्ये 8 गट आणि 16 गणांची वाढ झाली आहे. म्हणजेच जिल्हा परिषदेत 62 ऐवजी 70 गट असतील तर 124 ऐवजी आता 140 असतील. परिणामी यंदा जिल्ह्यात 8 वाढीव जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीचे सदस्य निवडले जातील. सध्या वाढीव लोकसंख्येनुसार एका गटात 35 हजार 703 एवढी लोकसंख्या असेल .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेतील वाढीव गट, गणांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लवकरच जिल्हा निवडणूक विभागाकडून सर्कल आणि गणांची माहिती संकलित करून त्याचा आराखडा शासनाकडे पाठवला जाईल. त्यानंतर आरक्षित असलेल्या जागांचा ड्रॉ होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या-