Gold Price: आज सोन्याचे दर चढाईच्या दिशेने, वाचा औरंगाबादचे भाव आणि सोबत Gold Gyaan
09 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49,100 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,000 रुपये एवढे दिसून आले.
औरंगाबादः दिवाळीच्या कालावधीत सराफा बाजारात सोन्याच्या दरात चांगलीच (Gold price) घसरण झालेली दिसून आली. तसेच चांदीच्या दरातही चढ-उतार सुरु होता. मात्र दिवाळीनंतर सोन्याच्या दरात काहीशी वाढ होताना दिसत आहे. औरंगाबादच्या सराफा असोसिएशनचे (Aurangabad sarafa market) अध्यक्ष राजेंद्र मंडलिक (Rajendra Mandlik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी 09 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49,100 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,000 रुपये एवढे दिसून आले.
मागील आठवड्याचा काय होता ट्रेंड?
औरंगाबादच्या सराफा बाजारात मागील आठवड्यातील सोने आणि चांदीच्या दरातील ट्रेंड काहीसा चढ-उताराचा दिसून आला. तो पुढील प्रमाणे- – 08 ऑक्टोबर रोजी सोमवारी 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,700 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,000 रुपये असे दिसून आले. – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,050 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे होते. म्हणजेच सोने आणि चांदीच्या दरात दिवाळीनंतर वाढ दिसून आली. – 03 नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,250 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे दिसून आले
Gold Gyaan- एखाद्या वस्तूवर कसा चढतो सोन्याचा वर्ख?
लाकूड, धातू, प्लास्टर किंवा कुठलीही वस्तू सोन्याच्या वर्खाने किंवा भुकटीचे सजवणे याला सोन्याचे वर्खकाम म्हणतात. सोने आणि चांदी यांचे मुलामे शोभेकरिता किंवा परावर्तनांक वाढवण्याकरिता वापरतात. प्राचीन काळी सोनार काम करणारे कारागीर वर्खकाम करण्यात अत्यंत निष्णात होते. कारागिर एखाद्या टोकदार हत्याराने टिपकागदात गुंडाळलेला सोन्याचा वर्ख किंवा भुकटी टोकदार हत्याराने काढतो. नंतर तो भाग वर्खकाम टोचणीवर घेतो. हळूवार नक्षीच्या भागावर लावतो. टोचणीवरील सोन्याचा वर्ख स्थिर राहण्यासाठी विद्युत भाराचा वापर कारागिर आपला ब्रश डोक्यावरील केसांत फिरवून हा विद्युत भार निर्माण करतो. काही वर्ख कामांसाठी कारगिर लाकडी उशीचा वापर करतात. त्यावर लोकरीच्या मऊ कापडाची घडी गायीच्या चामड्याने अच्छादलेली असते. एका बाजूला चर्मपत्राची फळी बनवलेली असते. त्यामुळे सोन्याचा नाजूक वर्ख वाऱ्याने उडून जात नाही. वर्खकाम पूर्ण झाल्यानंतर वर्खाने झाकलेला पृष्ठभाग उत्तम दर्जाच्या कापसाच्या थापीने थापतात. कापसाने घासल्यामुळे सोन्याची चमक अधिक वाढते. वर्खकाम करणारा कारागिर चमक आणण्यासाठी अकीकाचा खडा वापरतात. त्यामुळे धातूवर उत्तम चमक निर्माण होते. अंतिम वर्खाचे ढिले किंवा असमतल कण उंटाच्या केसांनी बनवलेला कुंचा वापरून काढून टाकले जातात. अनेक कारागीर सोन्याचा वर्ख चढवण्यासाठी अजूनही ही पारंपरिक पद्धत वापरतात. तर काही ठिकाणी आता यासाठी अद्ययावत यंत्रांचा वापर केला जातो.
इतर बातम्या-