Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Rain : तुफान पावसाने तलाव फुटला, मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून बाहेर काढलं

मुसळधार पावसाने औरंगाबादमध्ये थैमान घातलंय. जोरदार पावसानंतर औरंगाबादमधील भिलदारी पाझर तलाव फुटलाय. यानंतर नागद परिसरात भीषण पूर आलाय. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी बाहेर काढले.

Aurangabad Rain : तुफान पावसाने तलाव फुटला, मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून बाहेर काढलं
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 10:17 AM

औरंगाबाद : मुसळधार पावसाने औरंगाबादमध्ये थैमान घातलंय. जोरदार पावसानंतर औरंगाबादमधील भिलदारी पाझर तलाव फुटलाय. यानंतर नागद परिसरात भीषण पूर आलाय. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी बाहेर काढले. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार घडला. पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता.

मंदिराचा दरवाजा बंद, गावकऱ्यांनी स्लॅब फोडून पुजाऱ्याला वाचवलं

नागद गावातील मंदिराचा दरवाज बंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन रावबलं आणि स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढलं.

कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी सदृश परिस्थिती, पाझर तलाव फुटला

औरंगाबादमधील चाळीसगाव, कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झालीय. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला, तर कन्नड चाळीसगाव घाटात दरड कोसळली. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार माजलाय. ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय.

नागद गावात मोठं नुकसान, 30-40 गाई-म्हशींचा मृत्यू

भिलदारी पाझर तलाव फुटीचा नागद गावाला जबरदस्त फटका बसलाय. नागद गावातील 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू झालाय. पुराच्या पाण्यात फसून गाई म्हशींचा मृत्यू झाला. नदीच्या काठावरील गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशींचा मृत्यू झाला. भिलदारी धरण फुटल्यामुळे नदीला जोरदार पूर आला होता. यात हे नुकसान झालं.

कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलाय

औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात फसल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झालाय. अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे. यामुळे कन्नड तालुक्यातील 10-12 गावांचा संपर्क तुटलाय.

अंजना नदीला जोरदार पूर, अनेक गावांशी संपर्क तुटला

कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूलही मुसळधार पावसाने वाहून गेलाय. पळशी बुद्रुक, पळशी खुर्द आणि साखर वेल या गावांचा संपर्क तुटलाय. अंजना नदीला जोरदार पूर आलाय. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला. कन्नड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.

बीडला पावसाने झोडपलं

मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला आहे. तर आंबेसावळी नदीदेखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीलादेखील पाणी आले आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.

हवामानाचा अंदाज 

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

Aurangabad Weather: शहरात पावसाचा शिडकावा, वातावरणात गारवा, पुढचे 3 दिवस मध्यम पावसाचा अंदाज

Weather Report Today : राज्यातभरात संततधार, औरंगाबादेत पाझर तलाव फुटला, चाळीसगावात पूर, 3-4 दिवस पाऊस कोसळणार

Pune Weather | पुण्यात आज पावसाचं पुनरागमन होणार, रात्री जोरदार पावसाचा अंदाज

Heavy rain fall in Aurangabad bridge collapse temple in water land sliding

तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.