घोषणांची अतिवृष्टी, सरकारकडं भावनांचा दुष्काळ, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पेंडापूर येथे पोहचले. इथल्या परिस्थितीची पाहणी केली. उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथे अनेक शेतकरी आलेत. अनेकांच्या हातात निवेदनाची पत्रदेखील होती. औरंगाबाद जिल्ह्यातलं पेंडापूर हे गाव. पेंडापूर गावाची लोकसंख्या 1800 ते 1900 आहे. शेतातील मका, कपाशी व सोयाबीन या पिकांचं नुकसान झालं. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार घोषणांची अतिवृष्टी करत आहे. मात्र, राज्य सरकारकडं भावनांचा दुष्काळ आहे.
उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, पाऊस किती पडावं हे सरकारच्या हातात नसतं. दोन प्रकराच्या आपत्ती असतात. कोरडा दुष्काळ व अतिवृष्टी. अस्मानी संकटं आल्यानंतर त्याचं घरदार उघड पडू नये. हे सरकार सांगते की, दुष्काळ जाहीर करावा. अशी परिस्थिती नाही. म्हणून मी पाहणी करायला आलो. ही माझी प्रतिकात्मक भेट आहे.
खरं काय खोटं काय हे राज्यातल्या जनतेला कळू द्या. रेशन घ्यायला पण, पैसे नाहीत. शिधा येतो कुठूंन शेतकऱ्यांकडून ना. त्यात घोटाळा झाला नाही झाला हे नंतरच कळेल. 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीला शिवसेना पाठींबा देत असल्याचं ते म्हणाले. पंचनामे कधी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ऐन दिवाळीत सरकारकडं तुमच्याकडं लक्ष द्यायला वेळ नसला, तरी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका. धीर सोडू नका. आत्महत्येचा विचार मनात आणू नका. कृषिमंत्री, मुख्यमंत्री काय करतात. उत्सव साजरे करताना प्रजेकडं पाहणं हे राज्य सरकारचं काम असतं.