“मला राहायला स्वतःचं घरं नाही”, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या या नेत्याचं मोठं विधान

मी कोणत्याही डबल-तिप्पट पैसे होण्यावर विश्वास ठेवत नाही. माझ्याकडं असे लोक आले, तर त्यांना सांगतो की, असे ताबडतोब श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका.

मला राहायला स्वतःचं घरं नाही, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या या नेत्याचं मोठं विधान
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 9:06 PM

औरंगाबाद : उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार, विधान परिषद सदस्य अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, मला राहायला स्वतःचं घर नाही. मी माझ्या वडिलांच्या घरात राहतो. कुठं गुंतवणूक केल्याची माहिती असल्याचा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, माझी कुठंही गुंतवणूक नाही. असा कुठलाही पेपर माझ्याकडं नाही. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. मला राहायला स्वतःचं घरसुद्धा नाही.मी माझ्या वडिलांच्या घरात राहतो. मी गुंतवणूक (Investment) केल्याचा आरोप केला जातो. पण, बँका उपलब्ध आहेत. अकाउंट उपलब्ध असतात.

माझी गुंतवणूक करण्याची क्षमता नाही

मी कोणत्याही डबल-तिप्पट पैसे होण्यावर विश्वास ठेवत नाही. माझ्याकडं असे लोक आले, तर त्यांना सांगतो की, असे ताबडतोब श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका. काही जणांना तथाकथित नाव जोडलं असेल. याचा तपास झाला तरी माझी हरकत असायचं काही कारण नाही. माझी गुंतवणूक करण्याची क्षमता नाही, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं.

चौकशीसाठी मी तयार

दोन वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याचा फोन मला आला होता. पण, गुंतवणुकीसंदर्भात विचारना झाली. मी त्यांना चौकशी करायची असल्यास मी तयार असल्याचं सांगितलं होतं. माझ्या घरी येऊ शकता. किंवा मी तुमच्याकडं येऊ शकतो, असंही त्यांना सांगितलं होतं. माझी कोणतीही चौकशी होत असेल, तर मला काही प्राब्लेम नाही. असंही अंबादास दानवे यांनी स्पष्ट करून सांगितलं.

शुभांगी पाटील यांना पाठिंबा

राज्यातील पाचही जागा कुणी लढायचं हे ठरलेलं आहे. नाशिकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसनं ज्यांना उमेदवारी दिली होती, त्यांना पक्षातून काढलं आहे. शिवसेनेनं शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. अमरावती येथे महाविकास आघाडीनं काँग्रेससाठी जागा सोडली आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.