VIDEO: कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही: चंद्रकांत खैरे

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करतानाच खैरे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनाही चिमटे काढले आहेत. (chandrakant khaire)

VIDEO: कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही: चंद्रकांत खैरे
chandrakant khaire
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 4:00 PM

औरंगाबाद: शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करतानाच खैरे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनाही चिमटे काढले आहेत. कराड यांच्यापेक्षा माझी उंची खूप मोठी आहे. त्यांची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. (i made bhagwat karads political career, says chandrakant khaire)

चंद्रकांत खैरे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही टीका केली आहे. भागवत कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं खैरे म्हणाले.

कराड मला नेता मानतात

मी दिल्लीत गेलो होतो. पण कराडांना भेटलो नाही. माझ्याकडे वेळ नव्हता. ते येतील मला भेटायला. ते मला नेताच मानतात. मी त्यांना खूप सीनियर आहे, असं ते म्हणाले. मला ज्यांनी पाडलं त्या दानवेंना मी का शुभेच्छा द्याव्यात? असा सवालही त्यांनी केला. दानवेंनी भाजपचे 15 आमदार माझ्याविरोधात कामाला लावले. दानवेंमुळे अर्धा भाजप माझ्याविरोधात काम करत होता. त्यांचं काय अभिनंदन करायचं, असंही ते म्हणाले.

मराठवाडा शिवसेनेचाच गड

शिवसेनेला काटशह देण्यासाठी कराड यांना मंत्रिपद देण्यात आलं असेल तर चांगलं आहे. बरं आहे ना उलटं. ते दिल्याने आमच्याही लक्षात येतं. आमचे कार्यकर्तेही खडबडून जागे होतात आणि कामाला लागतात. त्यांना लोकसभेचं तिकिट दिलं तरी काहीच हरकत नाही. शिवसेनेची ही जागा आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. युतीतही शिवसेनेची जागा होती. महाविकास आघाडीतही शिवसेनेचीच जागा आहे, असं सांगतानाच मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. (i made bhagwat karads political career, says chandrakant khaire)

संबंधित बातम्या:

VIDEO: दानवेंनी रुग्णालयात बसून पैसे वाटले, माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या 5 बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, अकाऊंट ‘लॉक’, काँग्रेस नेते म्हणतात, ‘आम्ही लढत राहू!’

जातीवाचक शिविगाळ, विवाहबाह्य संबंधाच्या आरोपानंतर मनसे काय करणार? गजानन काळेंवर कारवाई होणार?

(i made bhagwat karads political career, says chandrakant khaire)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.