महिलांची मनं दुखवली गेली असतील तर मी खेद व्यक्त करेन, अब्दुल सत्तार यांनी दिली कबुली
पण, मी जे बोललो ते खोक्यांच्याबद्दल बोललो.
औरंगाबाद : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रीया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. मी माझे शब्द मागे घेतो, असं अब्दुल सत्तार यांनी म्हंटलंय. महिलांची मनं दुखावली गेली असतील, तर माफी मागेन, असं सत्तार म्हणाले. महिलांबाबत वाईट शब्द बोललो नाही, असंही सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं. कुठल्याही महिलेबद्दल अपमान करणारी वक्तव्य करत नाही.
ते म्हणाले, मी पहिलेच बोलू लागलो की, मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल अपशब्द बोललो नाही. आम्हाल जे लोकं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मी बोललो. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल किंवा कुठल्याही महिलांना अपमान जनक वक्तव्य मी केलं नाही. महिलांची मनं दुखली असतील, तर मी जरूर खेद व्यक्त करेन.
पण, मी जे बोललो ते खोक्यांच्याबद्दल बोललो. ज्यांच्या डोक्यामध्ये परिणाम आहे. परंतु, याचा अर्थ कुणी महिलांबद्दल करू लागला. महिलांच्या बद्दल एक शब्दही मी बोललो नाही. यापुढंही बोलणार नाही. आमचे मुख्यमत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात. मीसुद्धा महिलांचा सन्मान करतो. मी महिलांचा सन्मान करणारा एक कार्यकर्ता आहे, असंही सत्तार म्हणाले.
सिल्लोड येथे आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होती. तत्पूर्वी बोलताना अब्दुल सत्तार यांनी खोक्यावरून टीका करण्याची खरटपट्टी काढली. यावेळी खोक्यावरून टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून वाद सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले. ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली.