आम्हाला दिलासा दिला असता तर एवढं रामायण घडलंच नसतं, संजय शिरसाट यांचा आठवणींना उजाळा
पण, 15 मिनिटांत पाहणी दौरा होत असेल, तर त्यासारखं आश्चर्य नाही.
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्ह्यात दौरा केला. यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, आयुष्यामध्ये अशी संकटं येत असतात. माझ्यावरही संकट आलं होतं. पण, आजारपणाच्या काळात मी एक पाहिलं. आपण जर चांगली काम केलीत, तर लोकं आपल्यासोबत असतात. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. अनेकांचे फोन आले. अनेकांच्या शुभेच्छा आल्या. मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्ता भेटायला आला होता. हिम्मत हारायची नसते. एकदा जे काही संकट असतात. त्याला सामोरे जावं लागतं. कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळं मी ठणठणीत होऊन त्यांच्या सेवेत रुजू झालो.
आजार हा आजार असतो. दुसरं काही कुणी समजत असेल तर तो बालीशपणा म्हणावा लागेल. मी आज बातमी पाहिली. उद्धव ठाकरे आले. पंधरा मिनिटांचा दौरा केला.सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या घरी चहा पिण्यास गेल्यास किमान वीस मिनिटं लागतात. पण, 15 मिनिटांत पाहणी दौरा होत असेल, तर त्यासारखं आश्चर्य नाही.
पण, एक गोष्ट खटकली. विरोधी पक्षनेते या शहराचे आहेत. उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांना बोलायला नको होतं. त्यांना बोलावून का बोलायला लावलं हा माझा प्रश्न असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.
आपल्याकडं कंत्राटी बेसवर आलेले काही कार्यकर्ते आहेत ना. आजकाल भाषण करतात. त्यांना दौरा करायला लावायचा. त्यांनी भाषण करायचे आणि आम्ही टाळ्या वाजवायचे. यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही.
उद्धव ठाकरे यांना त्रास होतो. शरद पवार यांनी म्हंटलं की, उद्धव ठाकरे यांना त्रास होऊ नये. नवीन लोकांना कळू द्या. शिवसैनिकांची मेहनत काय असते, असा टोला त्यांनी सुषमा अंधारे यांना नाव न घेता लगावला.
उद्धव ठाकरे आले. त्यांचे स्वागत आहे. पण, येऊन दिलासा न देता जाणं हे काही बरोबर नाही. आम्हाला दिलासा दिला असता तर येवढं रामायण घडलंच नसतं,असा टोलाही संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.