छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नावावरून आधीपासूनच खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून टीका केली जात होता. आता नामांतरानंतर त्यांनी अनेक सवाल सरकारला विचारले आहेत. त्यामुळे नामांतराचा हा मुद्दा पुन्हा एकदा जोरदार पणे चर्चेत आला आहे. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराविषयी बोलताना म्हणाले की, G20 च्या निमित्ताने जो शहरात बदल झाला आहे तो नक्कीच चांगला आहे.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर बदलण्यासाठी हे 4 दिवस थांबले नाहीत असा टोला त्यांनी शिवसेना आणि भाजपला लगावला आहे. या वादाचा खरं तर जाती आणि धर्माबरोबर संबंध जोडू नका असंही त्यांनी यावेळी सांगितले.
मात्र तरीही जाणूनबुजून काही जण औरंगजेबाशी मुस्लिमांशी संबंध जोडला जात आहे असा टोला त्यांनी शिवसेना आणि भाजपला लगावला आहे.
नामांतराच्या भूमिकेविषयी भाजपची भूमिका दुटप्पी आहे. जर औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नावात बदल केले असतील तर बिहारमधील औरंगाबादचे नाव का बदलत नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मग त्यामध्ये नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई शहरांचीही नावं बदला असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
जर कोणतंही प्रकरण न्यायालयात असेल तर कोणताही निर्णय घेता येत नाही. त्यातच औरंगाबाद नामांतराचा विषय उच्च न्यायालयात असतानाही त्याबाबत निर्णय का घेण्यात आला.
त्यामुळे आता देशात लोकशाही आहे की नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तुमच्या या निर्णयामुळे कोर्टापेक्षा आम्ही मोठे आहे हेच दाखवून देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून आम्ही याला लवकरच विरोध करणार असल्याचेही खासदार जलील यांनी सांगितले.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर खासदार जलील म्हणाले की, तुम्ही महापुरुषांची नावं देऊन त्यांना मोठं करतायत अस तुम्हाला वाटतंय मात्र छत्रपती संभाजी महाराज हे महानच आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
पण ज्या महानतेच्या मुद्यावरून तुम्ही जर नाव बदलत असाल तर कोल्हापूरचेही नाव बदला. कारण छत्रपती शाहू महाराज यांचेही सामाजिक कार्य मोठे असल्याचे सांगत त्यांनी तुम्ही कोल्हापूरचे नाव छत्रपती शाहू महाराज द्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
पु्णे या शहरावरूनही त्यांनी नामांतराचा प्रश्न छेडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पुणे याचा अर्थ काय होतो हे माहीत नाही तर मग पुण्याचे नाव फुलेनगर ठेवा, नाहीतर फुले ठेवा. महात्मा फुले यांचे सावित्रीबाई फुले यांचे कार्यही मोठे आहे त्यामुळे त्यांचे नाव पुण्याला देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
त्यांनी ज्या प्रमाणे कोल्हापूर, पुणे या शहरांच्या नावात बदल करण्याची मागणी केली, त्याच प्रमाणे त्यांनी नागपूर शहराचेही नाव बदला आणि त्याचे नाव डॉ. बाबासाहेब नगरी ठेवा असंही त्यांनी यावेळी सांगितले. तर मुंबईचे नाव बदलून त्याचे नाव छत्रपती शिवाजीराजे महानगर नाव ठेवा अशी मागणी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आहे असंही त्यांनी सांगितले.
भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले की आपण जे नाव ठेवले आहेत ते काहीतरी ऐतिहासिक पार्श्वभूमी अहे म्हणून तुम्ही ती नावं ठेवली आहे.
तर मलिक अंबरने शहराचा विकास केला आहे, त्यांनी बसवले म्हणून मलिक अंबरचे नाव ठेवले पाहिजे होते असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी आपली राजकीय दुकानदारी सुरू करण्यासाठी घोषणा केली होती. आणि तेंव्हापासून घाणेरडे राजकारण सुरू झाले असल्याची टीका त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केली आहे.