औरंगाबादेत मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा, भाजप कार्यकर्त्यांची रस्त्यावर जमून घोषणाबाजी

भाजी मंडई हटवण्यावरून शहरातील वाळूज परिसरात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. (aurangabad BJP activist Waluj)

औरंगाबादेत मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा, भाजप कार्यकर्त्यांची रस्त्यावर जमून घोषणाबाजी
भापज कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे बॅरिकेट तोडले.
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 6:39 AM

औरंगाबाद : भाजी मंडई हटवण्यावरून शहरातील वाळूज परिसरात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी वाळूज परिसरात जमून मोठा गदारोळ केला. मध्यरात्री अचानकपणे झालेल्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. (on wednesday midnight BJP workers gathered in Waluj area and shouted slogans)

प्रशासनाच्या निर्णयाला भाजपचा विरोध

वाळूजमधील मोहटादेवी परिसरात 25 वर्षे जुनी भाजी मंडई आहे. ती हटवण्याचा येथील प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला येथील स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे. याच विरोधातून मंगळवारी मध्यरात्री वाळूज परिसरात भापज कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला. या जमावाने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर टायर पेटवले. तसेच त्यांनी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटचीही तोडफोड केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

विद्यापीठ रस्त्यावरुन दोन गटांत राडा

दरम्यान, औरंगाबाद शहराला दोन गटांतील तसेच, राजकीय वाद नवे नाहीत. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील रस्त्यावरुनही 27 जानेवारी रोजी वाद झाला होता. विद्यापीठ परिसरातील रस्त्यावरून (27 जानेवारी) काही तरुण आणि इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी तरुणांना दमबाजी केल्याचा आरोप काही तरुणांनी केला होता. तर दुसरीकडे तरुणांनाकडून इम्तियाज जलील यांना शिवीगाळ झाल्याचे जलील समर्थकांनी म्हटलं होतं. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे तरुण आणि इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ही बाचाबाची झाल्यानंतर जलील यांनी काही तरुणांना हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी 28 जानेवारी रोजी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात तशी तक्रारसुद्धा दिली होती. दाखल तक्रारीत जलील यांच्यासोबत अभियंता अशोक येरेकर यांच्यासुद्धा नावाचा उल्लेख होता.

संबंधित बातम्या :

औरंगाबाद नामकरणाचा वाद पेटला, ‘लव्ह औरंगाबाद’ फलकाची तोडफोड

औरंगाबादेत भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, नेमकं घडलं काय?

उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

(on wednesday midnight BJP workers gathered in Waluj area and shouted slogans)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.