Aurangabad Municipal Corporation : व्हायरल आराखड्यानंतर इच्छुकांना फुटला घाम, औरंगाबादमध्ये चर्चेला उधाण

मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा हा 17 मे पर्यंत देण्याची डेडलाईन होती. पण निवडणूक आयोगाकडून नकाशा मिळण्यास विलंब झाला होता. त्यामुळे नियोजन तर हुकलेच पण आयोगाने दिलेली लोकसंख्या आणि महापालिकेकडे असलेली लोकसंख्या यात तफावत येऊ लागली होती. त्यामुळेच नवीन आराखडा तयार करण्याचे काम सुरु असतानाच हा आराखडा फुटल्याचे बोलले जात आहे.

Aurangabad Municipal Corporation : व्हायरल आराखड्यानंतर इच्छुकांना फुटला घाम, औरंगाबादमध्ये चर्चेला उधाण
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 10:47 AM

औरंगाबाद : शहरात (Municipal Election) मनपा निवडणूकीचे वारे जोमात वाहत असताना दोन दिवसांपासून (Social Media) सोशल मिडियावर वार्डचा प्रभाग आराखडा व्हायरल झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. आराखडा फुटल्याची चर्चा आता (Aurangabad) शहरभर होत असून चौकाचौकात फुटलेल्या वार्डबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. एवढेच नाही तर इच्छूकांच्या हाती हा आराखडा आल्यावर अनेकांनी तर प्रभागाच्या हद्दीचा शोध घेण्यास सुरवात केली होती. यामुळे निवडणुकांपूर्वीच इच्छूकांना घाम फुटल्याचे चित्र आहे तर अनेकजण याच प्रभाग रचनेला घेऊन मताधिक्याची गणितेही मांडू लागली आहेत. मनपाकडून नवीन प्रभाग आराखडा तयार करण्याचे काम सुरु असतानाच प्रभाग आराखडा व्हायरल झाल्याने त्याला वेगळे असे महत्व प्राप्त झाले आहे.

यामुळे निर्माण झाला पेच

मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा हा 17 मे पर्यंत देण्याची डेडलाईन होती. पण निवडणूक आयोगाकडून नकाशा मिळण्यास विलंब झाला होता. त्यामुळे नियोजन तर हुकलेच पण आयोगाने दिलेली लोकसंख्या आणि महापालिकेकडे असलेली लोकसंख्या यात तफावत येऊ लागली होती. त्यामुळेच नवीन आराखडा तयार करण्याचे काम सुरु असतानाच हा आराखडा फुटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे इच्छूकांनी नाही म्हणत तरी त्या व्हायरल आराखड्यावरून मतदानाची गोळाबेरीज देखील करण्यास सुरवात केली होती.

व्हायरल झालेल्या प्रारुप आराखड्याचा फायदा कुणाला?

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या आराखड्याचा अभ्यास केला तर यामधील अनेक प्रभागात सेनेला साधा उमेदवारही मिळणार की नाही अशी स्थिती आहे. यामधील अनेक वार्डात एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला फायदा होईल असेच चित्र आहे. तर काही प्रभागात भाजपालाही फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आराखड्यामुळे संभाव्य उमेदवारांची लगबग पाहवयास मिळाली आहे. प्रभागाची रचना कशी आहे हे पाहण्यासाठी इच्छूक थेट प्रभाग हद्दीपर्यंत पोहचले होते.

हे सुद्धा वाचा

सोमवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार

महानगरपालिकेने केलेल्या प्रभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. काही मर्जीतल्या लोकांना हाताशी धरुन प्रभाग रचना केली जात असल्याचा आरोप आ. संजय शिरसाठ यांनी केला आहे. त्यामुळे 30 मे रोजी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे मनपा निवडणूकांचे अंदाज वर्तवले जात असतानाच हा व्हायरल आराखड्याने अनेकांची झोप उड़ाली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.