राष्ट्रपती पदाची निवडणूक हा आकड्यांचा खेळ! राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व पक्षाने सहमतीने एक उमेदवार द्याला, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य

| Updated on: Jun 15, 2022 | 11:32 AM

देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून अजित पवार उपस्थित असतानाही त्यांना भाषण करू दिलं नाही. यावर तीव्र टीका होतेय. याविषयी प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, ' अजित पवारांना बोलू दिलं नाही असं अजिबात नाही. आमचे पालकमंत्री सुद्धा आम्हाला जिल्हा बैठकीत बोलू देत नाहीत आमचं पद आणि वयाचा मान राखला जात नाही.

राष्ट्रपती पदाची निवडणूक हा आकड्यांचा खेळ! राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व पक्षाने सहमतीने एक उमेदवार द्याला, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना : राष्ट्रपती पदाची निवडणूक (President Election) हा आकड्यांचा खेळ आहे, राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व पक्षाने सहमतीने एक उमेदवार दिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आज केलं. जालन्यात त्यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना विविध विषयांवत मतं मांडली. देशात येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. यावेळी राष्ट्रपती पदासाठी केवळ नामधारी व्यक्ती न बसवता निर्णायाक भूमिका घेणारी व्यक्ती असावी, अशी भूमिका शिवसेनेतर्फे मांडण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं नावही चर्चेत आहे. शरद पवार मात्र यांनी आपली ही निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे सध्या तरी जाहीर केले आहे. जालन्यात आज भाजपच्या वतीने जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत.

आदित्य ठाकरेंवर काय म्हणाले दानवे?

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ अयोध्येत जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, प्रभू रामाचे दर्शन कोणीही घेऊ शकते यापूर्वी उध्दव ठाकरे गेले होते, मात्र त्यांनी प्रभू रामचंद्राला त्यांनी चांगली मागणी करा, बंद पडलेले सगळे प्रोजेक्ट सुरू व्हावेत, अशी मागणी त्यांनी करावी…

शरद पवार राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत…

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ राष्ट्रपती पदाची निवडणूक हा आकड्यांचा खेळ आहे, राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व पक्षाने सहमतीने एक उमेदवार दिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
शरद पवार हे आमचे विरोधी पक्षाचे नेते आहेत, ते या पदाला लायक आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही त्यांनी नकार दिला आहे, या निवडणुकीत भाग घ्यायचा की नाही घ्यायचे हे समजण्याइतके ते धूर्त आहेत.. असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘मोर्चे काढून झाकता येणार नाही’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी सुरु आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ नॅशनल हेअरॉल्ड हे प्रकरण भाजपने बाहेर काढलेले प्रकरण आहे, कोर्टाने काढलेले आहे, त्यानुसार चौकशी होत आहे, मोर्चे आंदोलने काढून आपला चेहरा झपण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. आपण घोटाळा केला नाही त्यांनी हे सिद्ध केले पाहिजे.

अजित पवारांना डावललं?

देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून अजित पवार उपस्थित असतानाही त्यांना भाषण करू दिलं नाही. यावर तीव्र टीका होतेय. याविषयी प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ अजित पवारांना बोलू दिलं नाही असं अजिबात नाही. आमचे पालकमंत्री सुद्धा आम्हाला जिल्हा बैठकीत बोलू देत नाहीत आमचं पद आणि वयाचा मान राखला जात नाही. त्यावेळी आम्ही अपमान समजत नाही आम्ही विरोध करत नाही, प्रधान मंत्र्यांच्या प्रोटोकॉल नुसार वेळ दिला नसेल बोलू दिलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे….