निवडणूक आयोग अशाप्रकारे निकाल देणार असेल तर कसं होणार?; अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना गंभीर सवाल…

देश संविधानावर चालतो, त्या संविधानापुढे सारेचजण नतमस्तक होतात, म्हणून संविधानाचा सन्मान करणे साऱ्यांचे कर्तव्य आहे असा सल्ला त्यांनी या सरकारला लगावला आहे.

निवडणूक आयोग अशाप्रकारे निकाल देणार असेल तर कसं होणार?; अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना गंभीर सवाल...
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 8:18 PM

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची वज्रमूठ ही आज संयुक्त सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यावेळी बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही त्यांनी ठपका ठेवला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अवमान केला होता, त्यावरूनही अजित पवार यांनी राज्य सरकारवर त्यांनी जोरदार घणाघात केला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकार आणि शिवेसेनेवर टीका करताना त्यांनी निवडणूक आयोग आणि शिवसेनेच्या चिन्हावर देण्यात आलेल्या निर्णयावरूनही त्यांनी सवाल उपस्थित केला आहे.

अजित पवार यांनी नऊ महिन्यापूर्वी घडलेल्या काही राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पायउतार व्हाव लागलं होते.

त्यानंतर महाविकास आघाडीची आज अशाप्रकारची भव्य दिव्य पहिलीच सभा होते आहे तीही अशी भव्य दिव्य सभा होत आहे. त्यामुळे या गोष्टीचे सगळ्यांनी स्वागत केले पाहिजे असंही त्यानी यावेळी सांगितले.

हिदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. प्रबोधनकारांनी या संघटनेचं नाव काय असावं ते सांगितलं होते असा इतिहास सांगत अजित पवारा यांनी शिंदे गटावरही घणाघात केला आहे.

यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, आम्ही आज विरोधी पक्षात काम करत आहे. मात्र देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात शिवसेना आणि चिन्हाबाबत ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. असा निकाल देशाच्या इतिहासात असा पहिल्यांदाच निकाल दिला गेला आहे अशी गंभीर टीका त्यांनी सरकारवर आणि निवडणूक आयोगाला सवाल उपस्थित केला आहे.

देश संविधानावर चालतो, त्या संविधानापुढे सारेचजण नतमस्तक होतात, म्हणून संविधानाचा सन्मान करणे साऱ्यांचे कर्तव्य आहे असा सल्ला त्यांनी या सरकारला लगावला आहे.

पण त्याला तिलांजली देण्याचं या सरकारने केलं आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. काही महिन्यापूर्वी सरकार पाडण्याचा जो प्रयत्न झाला तसा प्रयत्न जर राज्या राज्यातून घडत राहिला तर देशात स्थिरता राहणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय ज्यावेळी निवडणूक आयोगाने दिला तो निर्णयच खरं तर धक्कादायक होता. त्यामुळे निवडणूक आयोग जर एकाद्या पक्षाबद्दल अशाप्रकारे निकाल देत असेल तर देशाचं कसं होणार असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आपलं लक्ष असल्याचे सांगत न्यायदेवता योग्य न्याय देईल अशी खात्री व्यक्त करत त्यांनी न्यायालय तरी योग्य निर्णय देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.