“युज अँड थ्रो ही भाजपची भूमिका” ; ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपमधील अन्यायग्रस्त नेत्यांचं दुःख सांगितलं…

पंकजा मुंडे यांच्यासह अनेक जणांची भाजपमध्ये घुसमट सुरू आहे. अनेक नेत्यांना भाजपच्या ध्येयधोरणामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.

युज अँड थ्रो ही भाजपची भूमिका ; ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपमधील अन्यायग्रस्त नेत्यांचं दुःख सांगितलं...
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 6:45 PM

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच आता भाजपमधील अंतर्गत वादही आणखी उफाळून येवू लागले आहेत. त्यावरूनच आता राज्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. त्यावरून आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आता जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

मात्र भाजप लोकसभेसाठी अगदी महिना भरासाठी मोहिम राबवत असेल पण शिवसेना कायमस्वरूपी मोहिमेत असते असंही अंबादास दानवे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून येत आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपविषयी आपली भावना व्यक्त केल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

त्यावरूनच अंबादास दानवे यांनी पंकजा मुंडे यांचा संदर्भ देत त्यांनी भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची घुसमट सुरु असल्याचा दावा करत आता भाजपचे ध्येयधोरण बदलत चालले आहे असा टोला त्यांनी भाजप पक्षाला लगावला आहे.

पंकजा मुंडे यांच्यासह अनेक जणांची भाजपमध्ये घुसमट सुरू आहे. अनेक नेत्यांना भाजपच्या ध्येयधोरणामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना सांगितले की, जपचे कमर्शियललायझेशन झालं असून त्याचा फटका अनेक नेत्यांना बसाला आहे. पंकजा मुंडे यांनी ज्या प्रकारे आपली भूमिका मांडली होती, ती भूमिका त्यांची न राहता त्यांनी भाजपमधील हजारो भाजप कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे.

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर पत्राचाळीवरुन त्यांनी टीका केली होती. त्यावरून अंबादास दानवे यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय शिरसाठ यांनी राऊतांवर टीका न करता त्यांनी आपल्या मतदार संघातील पडलेल्या चाळीचा प्रश्न पाहावं असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील आणि भाजपचे बदलत समीकरण सांगितले. त्याचबरोबर त्यांनी युज अँड थ्रो ही भाजपची भूमिका राहिलेली आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी दिल्लीत चाललेल्या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर बोलताना सांगितले की, खेळाडूंवर झालेली कारवाई चुकीची आहे.

सरकारकडून खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे असून हीच भावना देशवासीयांची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली असली तरी त्यांनी संयम ठेवावा एक दिवस त्यांना त्यांच्या पक्षात नक्की न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपवर टीका करताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांवरही त्यांनी सडकून टीका केली आहे. त्या लोकांची मानसिक घालमेल सुरू असून त्यांच्यातील दोन-चार लोकं वगळले तर बाकीची लोकं मनाने शिंदेसोबत कधीच नव्हते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.