Aurangabad politics | उद्यानातील खासदार-आमदारांच्या पाट्या हटणार, मनपा प्रशासकांचे भाजपला आश्वासन

अखेर प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी येत्या चार दिवसात पाट्या काढून टाकण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तूर्त हे आंदोलन थांबवण्यात आल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली.

Aurangabad politics | उद्यानातील खासदार-आमदारांच्या पाट्या हटणार, मनपा प्रशासकांचे भाजपला आश्वासन
खाम नदी काठावरील उद्यानातील याच फलकांचा वाद औरंगाबादमध्ये चर्चेत आहे.
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 2:59 PM

औरंगाबादः शहरातील हर्सूलजवळील खाम नदीकाठी (Aurangabad Development) उभारलेल्या उद्यानातील प्रकल्पांना महापालिकेने आमदार आणि खासदारांची नावं दिली होती. मात्र हा सगळा प्रकार नेत्यांची हांजी-हांजी करण्यासारखा आहे, अशी टीका सर्वत्र होऊ लागली. त्यानंतर भाजपच्या मंत्री आणि नेत्यांनी आपल्या नावाचा फलक काढून टाका, अशी मागणी प्रशासकांकडे केली होती. तसेच इतर पक्षांच्या नेत्यांच्याही पाट्या काढून टाकण्यात याव्यात, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांनी दिला होता. मात्र येत्या चार दिवसात या पाट्या काढून टाकू, असे आश्वासन महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी दिल्याचे संजय केणेकर यांनी सांगितले. सीएसआर फंडातून उभारलेल्या प्रकल्पांना मंत्री आणि नेत्यांची नावे देऊ नयेत, अशी मागणी केली जात होती. अखेर मनपा प्रशासकांना या मागणीसमोर झुकावे लागेल, असेच दिसतेय.

काय आहे नेमके प्रकरण?

26 जानेवारी रोजी हर्सूल जवळील खाम नदीकाठी झालेल्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत करण्यात आले. शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार अंबादास दानवे यांच्यासह शहरातील आमदार, खासदारांची तसेच माजी महिला महापौरांची नावे येथील विकास प्रकल्पांना देण्यात आली होती. मनपा प्रशासक पांडेय यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला हा नामकरण सोहळा पार पडला. मात्र मनपा प्रशासनाने नेत्यांची खुशामत करण्यासाठी हा प्रकार केल्याची टीका सर्वत्र होऊ लागली. औरंगाबादकरांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

आमची नावं काढून टाका, कोण म्हणाले?

दरम्यान, विकासकामांना नेत्यांची नावं देण्यावरून औरंगाबादकरांचा रोष वाढू लागलाय, हे पाहता खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, माजी महापौर विजया रहाटकर यांनी प्रशासकांना लेखी पत्र देऊन आपली नावं मागे घेण्याच्या सूचना दिल्या. भाजप, मनसेनेही निवेदन देऊन तातडीने नावे काढण्याची मागणी केली. मात्र शिवसेनेच्या आमदारदांनी या नामकरणाचे समर्थन केले होते.

येत्या चार दिवसात पाट्या काढणार?

दरम्यान, लोकप्रतिनिधींनी पत्र पाठवल्यानंतरही मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी मंगळवारी दुपारी उद्यानात धडक दिली. तेथील कर्मचाऱ्यांना अद्याप पाट्या का काढल्या नाहीत, असा जाब विचाररला. यावेळी मनपाचे उपायुक्त सौरभ जोशींनी आंदोलकांशी चर्चा केली. प्रशासक पांडेय यांच्याशीही चर्चा घडवून आणली. अखेर प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी येत्या चार दिवसात पाट्या काढून टाकण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तूर्त हे आंदोलन थांबवण्यात आल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली.

इतर बातम्या-

10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करु, प्रियंका गांधींची मोठी घोषणा, जाहीरनाम्यात आणखी काय?

आईच्या वाढदिवसाला खास ‘ठेवणीतले फोटो’, सेम टू सेम सारा-अमृता, फोटो पाहाच…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.