अंजिठा लेणीवर बिबट्याचा वावर, वैजापूरमध्ये दोघांवर हल्ला, औरंगाबादेत खळबळ
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात एक बिबट्या फिरताना आढळून आला आहे. हा बिबट्या लेणी परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद करण्यात आला आहे.
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात बिबट्या फिरताना आढळून आला आहे. हा बिबट्या लेणी परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये वाकला येथे आणखी एका बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला आहे. एकाच दिवसात या दोन घटना घडल्यामुळे औरंगाबादेत खळबळ उडाली आहे. (Leopard seen in Aurangabad Ajanta Buddha cave premises in another incident of vaijapur Leopard attacked Two men)
अजिंठा लेणी परिसरात बिबट्याचा वावर
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेण्या या जगप्रसिद्ध आहेत. या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे लेणी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, लेणीच्या परिसरात अचानकपणे बिबट्या दिसला असून त्याचा वावर सीसीटीव्हीत कैद करण्यात आला आहे. यापूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये गर्दी नसल्यामुळे या बिबट्याने लेणी परिसरात ठाण मांडले आहे. हा बिबट्या अजिंठा लेणी तसेच लेणी समोरील जागेत दिसून आलाअसून अचानकपणे दिसलेल्या बिबट्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लेणी परिसरात बिबट्याचा वावर, पाहा व्हिडीओ :
वाकला गावात दोन नागरिकांवर हल्ला
एकीककडे अजिंठा लेण्यामध्ये बिबट्या फिरत असल्याचे समोर आले असून दुसरीकडे वैजापूर तालुक्यातही बिबट्याने नागरिकांवर गंभीर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तालुक्यातील वाकला येथील दोन नागरिक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या नागरिकांवर लोणी खूर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्यात आले. अचानकपणे बिबट्याने हल्ला केल्यामुळे वाकला गावाच्या परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.
वाकला गावात बिबट्याचा हल्ला, पाहा व्हिडीओ :
बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
दरम्यान अजिंठा लेणी आणि वैजापूर तालुक्यातील वाकला येथील आढळलेल्या दोन्ही बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी लेणीवर येणारे पर्यटक आणि वाकला गावातील नागरिक करत आहेत.
इतर बातम्या :
औरंगाबादेत डिझेलच्या टँकरचा अपघात, नागरिकांची ड्रम, भांडे घेऊन घटनास्थळी धाव
विवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास
(Leopard seen in Aurangabad Ajanta Buddha cave premises in another incident of vaijapur Leopard attacked Two men)