कुठल्याही परिस्थितीत 5200 पदं तातडीने भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, एकूण 12200 पदांची भरती

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली.

कुठल्याही परिस्थितीत 5200 पदं तातडीने भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, एकूण 12200 पदांची भरती
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 5:57 PM

औरंगाबाद: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजर पदे भरले जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर भरती

दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.

पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली घरं मिळावीत

दिलीप वळसे पाटील म्हणाले, आज औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक झाली. कायदा सुव्यवस्था परिस्थिती आणि गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना चांगली घरे चांगली सुविधा मिळाव्यात याबाबत चर्चा झाली आहे.

सर्वसामान्यांना सौजन्याची वागणूक द्या

सर्वसामान्य माणसाला सौजण्याची वागणूक मिळाली पाहिजे. महिला आणि त्याबाबत घडणारे गुन्हे याबाबत आस्थेवाईकपणे निर्णय घेतले पाहिजे. दोषींना शिक्षा केली पाहिजे या सूचना दिल्या असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांच प्रमाण जास्त

आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे यांचं प्रमाण मोठं आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर शाखेने चांगलं काम केलं पाहिजे. सोशल मीडियातून महिलांची बदनामी केली जाते याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे.

कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नाही, त्यावर विचार सुरु

पोलीस कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नाही ते वाटप करण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. संख्या वाढत आहे, रक्कम वाढत आहे, कोविडची अडचण आहे पण कर्जासाठी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मृत कर्मचाऱ्याच्या पाल्याला नोकरी

कोविडमध्ये ज्य पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचं धोरण स्पष्ट आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे,.50 लाख देण्याचं काम पूर्ण झालं आहे, जे राहील आहे त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.

इतर बातम्या

माझ्या वक्तव्याचा विपर्यास, मनगढत कहाण्या रचून सरकारमध्ये फूट पाडण्याचा डाव; पटोलेंचा भाजपवर वार

नाशिकच्या धरणांमध्ये 40 दिवसांचा पाणीसाठा, आठवड्यातील ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

Maharashtra Home Minister Dilip Walse Patil said Police recruitment for twelve thousand post start soon 5200 post filled before December in First Phase

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.